शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: कोल्हापूर , शनिवार, 22 एप्रिल 2017 (10:48 IST)

भरत जाधव यांना पितृशोक

actor bharat jadhavs father passes away
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते भरत जाधव यांचे वडील गणपत हरी जाधव (वय 87) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने कोल्हापुरात निधन झाले. त्यांनी मुंबई येथे अनेक वर्षे टॅक्‍सी ड्रायव्हर म्हणून काम केले आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. आठ दिवसांपूर्वीच ते मुंबई येथून कोल्हापुरातील सानेगुरूजी वसाहत येथील निवासस्थानी आले होते. शुक्रवारी सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, किरण, हरिभाऊ आणि अभिनेते भरत ही तीन मुले आणि एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 
 
शनिवार, दि.23 रोजी पंचगंगा स्मशानभूमी येथे सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी सकाळी दहा वाजता सानेगुरूजी येथील काशिद कॉलनी येथील निवासस्थानापासून अंतयात्रा काढण्यात येणार आहे.