गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑक्टोबर 2023 (13:03 IST)

अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरी घरकाम करणाऱ्या महिलेने चोरी केली

Pushkar Shrotri
मराठमोळा अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरी चोरी झाली असून तब्बल 10 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने व रोख रकम पळवली आहे. घरकाम करणाऱ्या उषा गांगुर्डे आणि भानुदास गांगुर्डे यांनी चोरी केली असून त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

अभिनेता पुष्कर श्रोत्री विले पार्ले ईस्ट मध्ये राहायला असून त्यांच्या घरी त्यांच्या वयोवृद्ध वडिलांची काळजी आणि घरकामासाठी  मदतनीस आणि मोलकरीण ठेवली होती. आरोपी उषा गांगुर्डे गेल्या 6 महिन्यांपासून पुष्करच्या घरी कामाला होती.सकाळी 8 वाजे पासून संध्याकाळी 8 वाजे पर्यत ती कामाला असे. उषाने पुष्करच्या घरातून 22 ऑक्टोबर रोजी 1.20 लाख रुपये रोख, तर 60 हजार रुपयांचे परकीय चलन चोरल्याचा संशय पुष्करच्या पत्नी प्रांजल यांना आला. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी उषाची चौकशी केली असता तिने चोरी केल्याचे काबुल केले. तिने आणि तिच्या पती भानुदास ने चोरीचे पैसे घेतल्याचे कबूल केले.   

त्यांना सोन्याच्या दागिन्यात देखील गडबड आढळली. त्यांनी सोन्याचे दागिने सोनाराकडे जाऊन तपासले असता ते खोटे असल्याचे आढळले. उषाने खरे सोन्याचे दागिने लंपास करून त्याऐवज खोटे बनावटी दागिने ठेवल्याचे समजले. उषा ने दागिने आणि पैसे असे दोन्ही मिळून तब्बल 10  लाखाचा ऐवज चोरी केल्याचे आढळले.  
पुष्करने गांगुर्डे दाम्पत्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. 
 
Edited by - Priya Dixit