रविवार, 2 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 28 सप्टेंबर 2025 (17:10 IST)

अभिनेत्री अलका कुबल यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला

Actress Alka Kubal
मराठी चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या खूप जवळच्या व्यक्तीचं निधन झाले आहे. अभिनेत्रींचे मोठे भाऊ ज्येष्ठ चित्रपट संकलक वसंत कुबल यांचे वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले.
ते गेल्या महिन्याभरापासून पक्षाघाताच्या त्रासाने आजारी होते. शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे कुबल कुटुंबात शोककळा पसरली आहे. 
शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचे मित्र परिवार त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. 
वसंत कुबल हे मराठी चित्रपटसृष्टीत संवेदनशील संकलक म्हणून ओळखले जायचे. त्यांनी कुंकू लावते माहेरचे, लढाई, माय माउली मनुदेवी, स्नेक अँड लेडर चॅम्पियन्स, परीस या चित्रपटांचे संपादन केले. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. 
Edited By - Priya Dixit