Marathi Biodata Maker

ठाकूर अनुपसिंगचं 'बेभान' पोस्टर

मंगळवार, 3 जानेवारी 2017 (16:41 IST)
मराठी सिनेसृष्टीत अनेक चांगले विषय हाताळले जात आहेत, याचाचं परिणाम हिंदी सिनेसृष्टीत आपले नशीब अजमावणारे कलाकार मराठी सिनेसृष्टीकडे वळत आहेत. हिंदीत नावाजलेल्या अनेक कलाकारांची  उदाहरणे देता येतील. 'लय भारी' या सिनेमातून शरद केळकर, गुरु सिनेमातून 'मुरली शर्मा' यांनी मराठी सिनेमात पदार्पण केले. ठाकूर अनूपसिंग या हिंदी सिनेसृष्टीतल्या अभिनेत्यालाही मराठी सिनेमांचा मोह आवरता आला नाही. दिग्दर्शक अनुप अशोक जगदाळे यांच्या 'बेभान' या सिनेमातून ठाकूर अनुपसिंग मराठीत दमदार पदार्पण करणार आहे. वयाच्या २२ वर्षांपासून ठाकूर अनुपसिंगने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात छोट्या पडद्यापासून केली.

बेभान या सिनेमातून ठाकूर अनुपसिंगचा राऊडी लुक आपल्याला पाहायला मिळणार आहे. नुकतचं या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे.सोशल मीडियावर पोस्टरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या पोस्टरवर ठाकूर अनुपसिंगचा रांगडा तसेच प्रेमात बेभान झालेला प्रियकर आपल्याला दिसून येतोय. प्रेमाचा रंग लाल असल्याने हे पोस्टरदेखील लाल रंगाच्या बॅकग्रॉउंडवर बनवण्यात आला आहे. मृण्मयी देशपांडे आणि ठाकूर अनुपसिंग या दोघांच्या प्रमुख भूमिका आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. मधुकर (अण्णा ) उद्धव देशपांडे यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून प्रसाद देशपांडे हे सहनिर्माते आहेत. दिनेश देशपांडे लिखित आणि शांभवी फिल्म्स निर्मित हा सिनेमा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सर्व पहा

अदा शर्मा 'गजरा' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज

Ramayana Scene Leaked रणबीरच्या 'रामायण'मधील ११ सेकंदांची क्लिप लीक! यूजर्स नाराज

आशुतोष राणा यांनी भक्तांना महत्त्वपूर्ण भेट दिली; आता घरबसल्या १०० मंदिरांचे दर्शन घडणार

कंगना रणौत 'लॉक अप २' मध्ये लोकांचा आवाज म्हणून शोमध्ये प्रवेश करणार

Subodh Bhave in Queen 2 सुबोध भावे 'Queen 2' मध्ये कंगना रणौतच्या पतीच्या भूमिकेत

सर्व पहा

आमिर खान वयाच्या ६१ व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न करणार, मुसळधार पावसातही त्यांचे घर दिव्यांनी आणि फुलांनी सजवले

इंदूरमध्ये सानंद सदस्यांसाठी ११-१२ जुलै रोजी 'देऊळबंद २' चित्रपटाचे खास प्रदर्शन!

मुंबईतील पावसामुळे उर्वशी ढोलकियाच्या गाडीवर भलेमोठे झाड कोसळले, व्हिडिओ पाहा

गुरुग्राममध्ये अभिनेते चंद्रचूड सिंग यांच्या घरावर बुलडोझरची कारवाई

महाराष्ट्रातील १० धबधबे जे जुलैमध्येच दिसतात सर्वात सुंदर

पुढील लेख
Show comments