लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'बिबट्या'

marathi movie
Last Modified बुधवार, 14 एप्रिल 2021 (09:27 IST)
बिबट्या म्हटलं की अनेकांच्या मनात धडकी भरते. या नावाशी अनेकांचे वेगवेगळे अनुभव, भावना, कथा जोडलेल्या आहेत. याच नावाचा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर 'बिबट्या' या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.या सिनेमाची निर्मिती स्वयंभू प्रॅाडक्शनची असून या सिनेमाचे दिग्दर्शन चंद्रशेखर सांडवे यांनी केले आहे.चित्रपटाच्या पोस्टरवरून प्रकाशाने झगमगलेले शहर दिसत आहे व लांब कुठल्यातरी डोंगरावरून एका काळ्या आकृतीतील बिबट्या त्या शहराकडे बघताना दिसत आहे.या सिनेमाचे पोस्टर एक गूढता निर्माण करते.
या सिनेमात विजय पाटकर, महेश कोकाटे, अनंत जोग, प्रमोद पवार, डॉ विलास उजवणे, अशोक कुलकर्णी, ज्ञानदा कदम, मनश्री पाठक, सचिन गवळी, सोमनाथ तडवळकर, सुभोद पवार, चैत्राली डोंगरे, सुशांत मांडले आदी
कलाकार आहेत. बिबट्याच्या काळ्या आकृतीवरून बिबट्याचे भविष्य अंधारात आहे असे तर दिग्दर्शकाला सुचवायचे नसेल, ते आपणास चित्रपट पहिल्यावरच कळेल. हे पोस्टर पाहून लोकांमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या चित्रपटाची कथा चंद्रशेखर सांडवे यांची आहे तर पटकथा चंद्रशेखर सांडवे व आर. मौजे यांची असून या चित्रपटाचे संवाद कमलेश खंडाळे यांनी लिहले आहेत.तर छायाचित्रिकरणाची धुरा गणेश पवार यांनी सांभाळली आहे.
पोस्टरवरील नाव देखील अगदी लक्षवेधक आहे.बिबट्याने आज येथे हल्ला केला ,शहरात आज बिबट्या या ठिकाणी आढळला या व अश्या अनेक बातम्या आपण वारंवार ऐकतो.हा चित्रपट नक्की याच धाटणीवर आहे की कोणता नवीन विषय घेऊन तो लोकांसमोर येणार आहे हे लवकरच समजेल.शहरातील लोकांना बिबट्या हा एक हिंस्र प्राणी असून तो केवळ शहरात त्रास देण्यासाठीच येत असतो या पलीकडे काहीच माहिती नाही. तो आपल्या शहरात येत नसून आपण त्याच्या जंगलात शिरलो आहोत, हे ते पूर्णपणे विसरले आहेत.हाच विषय घेऊन हा सिनेमा येत आहे कि कोणता नवीन विषय मांडणार आहे.दिग्दर्शकाला हाच विषय का निवडावासा वाटला.या व अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळतील.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

कंगना रनौत ला दिलासा नाही , कंगनाला कोर्टानं फटकारलं

कंगना रनौत ला दिलासा नाही , कंगनाला कोर्टानं फटकारलं
अभिनेत्री कंगना रनौत नेहमी आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असते. त्यामुळे तिला बऱ्याच ...

निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं मुन्नार हिल स्टेशन

निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं मुन्नार हिल स्टेशन
हिल स्टेशनला नयनरम्य हिल स्टेशन म्हणतात. भारतामध्ये डोंगरांच्या मोठ्या ,लांब, सुंदर आणि ...

बरोबरच जाऊ या

बरोबरच जाऊ या
पक्याचे वडील पक्याला रागावत असतात वडील- पक्या, तुझ्या कडून एक काम नीट होत नाही, तुला ...

Lagaan: आमिर खानने 'लगान' सिनेमाला वाईट चित्रपट का म्हटलं ...

Lagaan: आमिर खानने 'लगान' सिनेमाला वाईट चित्रपट का म्हटलं होतं?
मधू पाल 2001 साली आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला 'लगान' चित्रपट हिंदी ...

'मुलगी झाली हो' महाराष्ट्राची नंबर 1 मालिका

'मुलगी झाली हो' महाराष्ट्राची नंबर 1 मालिका
मराठी मालिक आणि त्यांच्या कलाकारांना नेहमीच प्रेक्षकांचा प्रेम आणि प्रतिसाद लाभत असतो. ...