Marathi Biodata Maker

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'बिबट्या'

Updated: बुधवार, 14 एप्रिल 2021 (09:34 IST)
 
या सिनेमात विजय पाटकर, महेश कोकाटे, अनंत जोग, प्रमोद पवार, डॉ विलास उजवणे, अशोक कुलकर्णी, ज्ञानदा कदम, मनश्री पाठक, सचिन गवळी, सोमनाथ तडवळकर, सुभोद पवार, चैत्राली डोंगरे, सुशांत मांडले आदी  कलाकार आहेत. बिबट्याच्या काळ्या आकृतीवरून बिबट्याचे भविष्य अंधारात आहे असे तर दिग्दर्शकाला सुचवायचे नसेल, ते आपणास चित्रपट पहिल्यावरच कळेल. हे पोस्टर पाहून लोकांमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या चित्रपटाची कथा चंद्रशेखर सांडवे यांची आहे तर पटकथा चंद्रशेखर सांडवे व आर. मौजे यांची असून या चित्रपटाचे संवाद कमलेश खंडाळे यांनी लिहले आहेत.तर छायाचित्रिकरणाची धुरा गणेश पवार यांनी सांभाळली आहे.
 
पोस्टरवरील नाव देखील अगदी लक्षवेधक आहे.बिबट्याने आज येथे हल्ला केला ,शहरात आज बिबट्या या ठिकाणी आढळला या व अश्या अनेक बातम्या आपण वारंवार ऐकतो.हा चित्रपट नक्की याच धाटणीवर आहे की कोणता नवीन विषय घेऊन तो लोकांसमोर येणार आहे हे लवकरच समजेल.शहरातील लोकांना बिबट्या हा एक हिंस्र प्राणी असून तो केवळ शहरात त्रास देण्यासाठीच येत असतो या पलीकडे काहीच माहिती नाही. तो आपल्या शहरात येत नसून आपण त्याच्या जंगलात शिरलो आहोत, हे ते पूर्णपणे विसरले आहेत.हाच विषय घेऊन हा सिनेमा येत आहे कि कोणता नवीन विषय मांडणार आहे.दिग्दर्शकाला हाच विषय का निवडावासा वाटला.या व अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळतील. 

सर्व पहा

गरुड पुराणावर आधारित असेल अजय देवगणचा 'सूर्यस्पर्श'; अभिनेता एका अलौकिक अवतारात दिसणार!

चित्रीकरणाच्या ७ दिवस आधी अक्षय खन्ना 'दृश्यम ३' मधून बाहेर पडला, जयदीप अहलावतचा प्रवेश

'जेलर २' मधील विद्या बालनचा धोकादायक लूक समोर आला; अभिनेत्री 'कांता'च्या भूमिकेत रजनीकांतसोबत टक्कर देणार

'हनुमान अंश'च्या प्रचंड कमाईनंतर, डॉ. विशाल चतुर्वेदी यांची मोठी घोषणा: ते 'राम बोला'मधून मिळणारी १००% कमाई दान करणार

अनुभव सिन्हा यांच्या चित्रपटात वहिदा रहमान साकारणार महात्मा गांधींच्या आई पुतलीबाईची भूमिका

सर्व पहा

शाहरुख खानपासून ते आलिया भट्टपर्यंत, अनेक सेलिब्रिटींनी राणी मुखर्जी यांच्या आईच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली

गरुड पुराणावर आधारित असेल अजय देवगणचा 'सूर्यस्पर्श'; अभिनेता एका अलौकिक अवतारात दिसणार!

राणी मुखर्जी यांच्या आई कृष्णा मुखर्जी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

शाहरुख खानने पत्नी गौरी आणि मुलगी सुहानासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले

चित्रीकरणाच्या ७ दिवस आधी अक्षय खन्ना 'दृश्यम ३' मधून बाहेर पडला, जयदीप अहलावतचा प्रवेश

पुढील लेख
Show comments