शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 एप्रिल 2025 (12:53 IST)

आता माहोल टाईट, आला बुंगा फाईट... सजना चित्रपटाचं धमाल गाणं "Bunga Fight" सर्वत्र धुमाकूळ घालतंय

Bunga Fight From Sajana is a Marathi language song
मराठी गाण्यांनी सध्या सोशल मीडियावर एक चांगला ट्रेंड सेट केलाय. सर्वत्र मराठी गाणी वाजताय आणि गाजताय सुद्धा. अशातच आणखी एका मराठी गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलाय.  शशिकांत धोत्रे दिग्दर्शित सजना चित्रपटाचं धमाल गाणं "बुंगा फाईट" हे मराठी गाणंही आता रसिकांच्या पसंतीस उतरतंय. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या याच गाण्याची चर्चा सुरु आहे. 
 
सजना चित्रपटातला "बुंगा फाईट" हे गाणं एक पॉप्युलर डान्स नंबर ठरत आहे ह्यात काही शंका नाही. प्रेक्षक आत्ताच ह्या गाण्यावर थिरकायला लागली आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये हे गाणं वाजतय, प्रेक्षक डान्स करताना दिसत आहेत. अशातच आता प्रेक्षकांना हे गाणं लाईव्ह सुद्धा ऐकायला मिळालं. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे ह्यांनी हे गाणं गायलं आहे आणि नुकतच त्यांनी प्रेक्षकांचं लाईव्ह मनोरंजन केलं आणि त्यांना प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आपल्या चाहत्यांसाठी त्यांनी वेग वेगळ्या ठिकाणी परफॉर्म केलं. 'सजना' सिनेमातील "बुंगा फाईट" हे गाणं नक्कीच प्रेक्षकांना वेड लावत आहे हे आनंद शिंदे ह्यांनी पटवून दिलय. इतकच नव्हे तर ह्या गाण्यानी २.५ मिलियन व्युजचा आकडा पार केलाय. 
गावरान भाषा आणि लोकसंगीताची छाप या गाण्यात पहायला मिळते. "बुंगा फाईट" या गाण्याला ओंकारस्वरूप ह्यांनी संगीत दिलं आहे. तर सुहास मुंडे यांचे शब्द आहेत. 'सजना' चित्रपटाची निर्मिती स्वतः शशिकांत धोत्रे ह्यांनी केली आहे तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन सुद्धा शशिकांत धोत्रे ह्यांनी केलं आहे. 'सजना' २३ मे २०२५ ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.