शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 29 जानेवारी 2020 (14:19 IST)

प्राजक्ता माळी विरुद्धचा खटला न्यायालयाने केला रद्द

मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याविरोधात तिची डिझायनर जान्हवी मनचंदा हिने मारहाण केल्याप्रकरणी फौजदारी खटला दाखल केला होता. मात्र ह्यात काय तथ्य नसून न्यायालयीन आदेशात कायदेशीर त्रुटी असल्याचे स्पष्ट करत हा खटला रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणातून प्राजक्ता माळीला क्लीनचिट मिळाली आहे.
 
कनिष्ठ न्यायलयाच्या आदेशाच्या विरुद्ध प्राजक्ता माळी हिच्या वकिलांनी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. दरम्यान, ठाणे जिल्हा सत्र न्यालालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून प्राजक्ता माळी हिच्याविरुद्ध असलेल्या तक्रारीमध्ये तथ्य नाही आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशात कायदेशीर त्रूटी असल्याचे स्पष्ट केले आहे. अखेर, प्राजक्ता विरुद्ध दाखल करण्यात आलेला सदर खटला रद्द करण्यात आला आहे.
 
हा संपूर्ण सदर खटला प्राजक्ताच्या बाजूने ऍड.अभिषेक अवचट व प्रताप परदेशी यांनी लढवला आहे. तसेच सदर खटल्यात प्राजक्ता माळी हिची जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन बदनामी केली असल्याच्या प्रकरणाबद्दल फिर्यादी विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात प्राजक्ताचे वकील आहेत.