रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (14:18 IST)

Daagdi Chaawl 2 Trailer: 'दगडी चाळ 2' चा ट्रेलर प्रदर्शित

Daagdi Chaawl 2
नुकताच 'दगडी चाळ 2' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर पाहून चित्रपट पाहाण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 
 
मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित 'दगडी चाळ 2' या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कणसे यांनी केले असून रत्नकांत जगताप कार्यकारी निर्माता आहेत. येत्या 19 ऑगस्ट रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.  सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘दगडी चाल 2’ च्या ट्रेलर लाँचला चित्रपटाच्या कलाकारांसह अरुण गवळी स्वत: चित्रपटाच्या टीमसोबत दक्षिण मुंबईतील दगडी चाळ येथे गेले होते आणि येथे त्यांनी चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर दोन्ही लाँच केले. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर काही तासांनंतर, लोकांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादावरून हे स्पष्ट होते की प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
 
अरुण गवळीच्या जीवनावर बनलेला आणि २०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘दगडी चाळ’ या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ 2’ मध्ये अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे आणि पूजा सावंत मुख्य भूमिकेत आहेत.