testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

प्रेमवीरांची 'दांडी गुल'

premwaari
Last Modified मंगळवार, 29 जानेवारी 2019 (11:40 IST)
प्रेमावर आधारित असलेल्या 'प्रेमवारी' या चित्रपटाचे एक धमाल असे 'दांडी गुल' गाणे प्रदर्शित झाले आहे. उडत्या चालीचे हे गाणे अमितराज, आदित्य पाटेकर आणि हर्षवर्धन वावरे यांनी स्वरबद्ध केले असून अमितराज यांनी संगीतबद्ध केले आहे. 'कितीबी घासली नशिबाने ठासली सक्सेस देतया हूल' असे हटके शब्द एकत्रित गुंफून हे गाणं गुरु ठाकूर यांनी शब्दबद्ध केले आहे. इंजिनीरिंगला शिकणारी ही मुलं हॉस्टेल मध्ये राहताना जी काय मजा मस्ती करतात त्याचे अचूक चित्रण या गाण्यात करण्यात आले आहे. कॉलेज जीवनातील आणि ते पण हॉस्टेल मध्ये राहत असताना केली जाणार धमाल या गाण्यात दिसून येत आहे. या गाण्याचे सुजित कुमार यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे.
'दांडी गुल' हे गाणं कोपरगाव येथील संजीवनी कॉलेज मध्ये शूट झाले आहे. तसेच गाण्याचा काही भाग त्रंबकेश्वर येथे सुद्धा शूट झाला. हे गाणं चित्रित करताना चित्रपटाच्या टीमला पावसाचा खूप अडथळा येत होता. जेव्हा जेव्हा गाणं शूट करण्यासाठी टीम कॅमेऱ्यासह तयार व्हायची नेमका तेव्हाच पाऊस सुरु व्हायचा आणि जेव्हा
टीम कॅमेऱ्यासह गाडीत बसायचे तेव्हा पाऊस थांबायचा असं अनेक वेळा झालं. शेवटी सिनेमाच्या टीमने कॅमेरा प्लँस्टिक कव्हरने पूर्ण झाकला आणि गाण्याचे चित्रीकरण पूर्ण केले. या कव्हर मुळे पाऊस असताना सुद्धा गाणे शूट करण्यात आले.
प्रेमवारी सिनेमाच्या मागील सर्व गाण्यांना मिळालेल्या भरघोस प्रतिसादा प्रमाणे या गाण्यालाही रसिक उत्तम प्रकारे प्रतिसाद देतील यात शंका नाही. प्रेमावर आधारित असलेल्या आणि प्रेमाची नवीन परिभाषा सांगणारा हा सिनेमा येत्या ८ फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. फेब्रुवारीचा पहिला आठवडा आणि प्रेमावर आधारित 'प्रेमवारी' चित्रपट. हा उत्तम योग जुळून येत आहे.या चित्रपटात प्रेक्षकांना चिन्मय उदगीरकर, मयुरी कापडणे, अभिजित चव्हाण, भारत गणेशपुरे यांच्या या
प्रमुख भूमिका आहेत. साईममित प्रोडक्शन निर्मित ‘प्रेमवारी’ या चित्रपटाची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले असून,प्रस्तुतीही त्यांचीच आहे. प्रेमाचे महत्व अधोरेखित करणारा हा चित्रपट प्रेमाच्या महिन्यात अर्थात ८ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.


यावर अधिक वाचा :

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल' चित्रपट चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस ...

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान
कृष्णधवल चित्रपटांपासून ते आताच्या डिजिटल युगापर्यंतचे अनेक टप्पे यशस्वीरित्या पार करत आज ...

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट हे हॉरर चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘१९२०’ आणि ...

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे
बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमला आपल्या होम टाऊन अर्थात हिमाचल प्रदेशात जायचे आहे. यामी गौतम ...

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन
यंदाच्या इंटरनॅशनल एमी या पुरस्कारांची नामांकन यादी जाहिर करण्यात आली. यात नेटफ्लिक्सची ...

आता आयुष्मान खुरानाला करायचे आहे निगेटिव्ह रोल

आता आयुष्मान खुरानाला करायचे आहे निगेटिव्ह रोल
आयुष्मान खुरानाने आतापर्यंत “विकी डोनर’, “बधाई हो’ आणि “अंधाधुन’ सारख्या सिनेमांचा समावेश ...

शाहरुख खानची मुलगी सुहाना बनली काऊ गर्ल, असे फोटे इंटरनेटवर ...

शाहरुख खानची मुलगी सुहाना बनली काऊ गर्ल, असे फोटे इंटरनेटवर पोस्ट केले
सुहाना खान सध्या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये अभिनया अभ्यास शिकत आहे. तिच्या मित्रांसोबत ...

रामलीलेची तुलना पॉर्नशी? प्रकाश राज अडचणीत

रामलीलेची तुलना पॉर्नशी? प्रकाश राज अडचणीत
अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेले प्रकाश राज रामलीलेसंद्रभात केलेल्या एका वक्तव्यामुळे ...

दबंग 3 चा ट्रेलर या शैलीत लॉन्च होईल

दबंग 3 चा ट्रेलर या शैलीत लॉन्च होईल
बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानचा आगामी चित्रपट ‘दबंग 3’ चा ट्रेलर अनोख्या पद्धतीने लाँच ...

मराठीतील पहिला भव्य ॲक्शनपट....’बकाल’चा ट्रेलर प्रदर्शित !!

मराठीतील पहिला भव्य ॲक्शनपट....’बकाल’चा ट्रेलर प्रदर्शित !!
समीर आठल्ये दिग्दर्शित मराठीतील पहिला भव्य ॲक्शनपट बकालचा टीजर नुकताच सोशल मिडीयावरून