1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
  4. first promo of Tejashree Pradhan Premache Gosht

तेजश्री प्रधानच्या 'प्रेमाची गोष्ट' मालिकेचा पहिला प्रोमो भेटीला

Tejashri Pradhan New Serial Premachi Goshta मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेची प्रोमो भेटीला आला असून याचे नाव 'प्रेमाची गोष्ट' असे आहे.
 
प्रेमाची गोष्ट मालिकेच्या या प्रोमोत तेजश्री एका मध्यमवर्गीय कुटूंबातली मुलगी असून तिची आई तिच्या लग्नासाठी स्थळं शोधत असताना दिसत आहे. पण तेजश्री आईला म्हणते, मुल जन्माला घालु न शकणारी मुलगी बायको म्हणुन चालेल का?
 
तर पुढे एक कोळी कुटुबांतील एक मुलगा ऑफीसला जात असताना त्याची आई त्याला लग्नासाठी मुलींचे फोटो दाखवते तेव्हा तो म्हणतो ही मुलगी सईची आई होऊ शकेल का?
 
पुढे एक लहान मुलगी शाळेत जात असताना तेजश्रीसोबत खेळताना दिसते. 
 
प्रेमाची गोष्ट ही मालिका ये हे मोहब्बते या हिंदी मालिकेचा रिमेक आहे. ज्यात करण पटेल, दिव्यांका त्रिपाठी प्रमुख भुमिकेत होते. तर प्रेमाची गोष्ट या मालिकेत तेजश्री प्रधान, राज हंचनाले प्रमुख भुमिकेत असून शिवाय शुभांगी गोखले, संजीवनी जाधव सुद्धा प्रमुख भुमिकेत आहेत.
 
तेजश्री प्रधानने व्यक्त केल्या भावना
या नव्या पात्राविषयी सांगत तेजश्री म्हणाली, मी ठरवून एक प्रोजेक्ट संपल्यानंतर काही काळ दिसणं टाळते. 
 
तेजश्री प्रधानने सांगितले की स्टार प्रवाहवर लवकरच एका नव्या मालिकेतून मी भेटीला येणार आहे. जवळपास बारा वर्षांपूर्वी मी स्टार प्रवाहची तुझं नि माझं घर श्रीमंताचं ही मालिका केली होती. तर काही दिवसांपूर्वी फुलाला सुगंध मातीचा मालिकेतही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. तिने म्हटले की प्रेक्षकांचं प्रेम असंच मिळत राहो हीच अपेक्षा. 
पुढील लेख
हनी ट्रॅप प्रकरणी अभिनेत्री नित्या सासीला अटक, 75 वर्षीय व्यक्तीला धमकी देत 11 लाख रुपये उकळले