suvichar

मैत्री आणि कुटुंबाची धम्माल सांगतोय 'फुगे' चा नवा पोस्टर

बुधवार, 11 जानेवारी 2017 (14:15 IST)
प्रेम हे आंधळे असते... असे म्हणतात, पण जर हे प्रेम दोन मित्रांमध्ये असेल तर ! प्रेमाची ही हटके बॅकस्टोरी सांगणारा 'फुगे' हा सिनेमा येत्या १० फेब्रुवारी रोजी वेलेन्टाईन डे ची मोठी मेजवानी घेऊन येणार आहे. स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांच्या फक्कड मैत्रीवर आधारित असलेल्या या सिनेमाची प्रदर्शनापूर्वीच मोठी चर्चा होत आहे. 'फुगे' या हटके नावातच मोठी गम्मत असलेल्या या सिनेमाचा नुकताच दुसरा पोस्टर सोशल साईटवर लॉंच करण्यात आला. याही पोस्टरमध्ये स्वप्नील-सुबोधच्या याराणा ठासून भरलेला दिसून येतो, पण यासोबतच सिनेमातील इतर स्टारकास्ट मंडळीदेखील या पोस्टरमध्ये दिसून येतात. मैत्रीच्या विश्वात रमलेल्या या दोन मित्रांच्या खाजगी आयुष्यात त्यांच्या मैत्रीमुळे झालेल्या सावळागोंधळाची प्रचीती हा पोस्टर पाहताना होतो. या सिनेमात प्रार्थना बेहेरे आणि नीता शेट्टी या अभिनेत्री देखील आहेत, तसेच मोहन जोशी, आनंद इंगळे आणि सुहास जोशी या ज्येष्ठ कलाकरांचा देखील यात समावेश आहे. विशेष म्हणजे हे तिघेही एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. 
 
केवळ स्वप्नील- सुबोध नव्हे तर 'फुगे' च्या संपूर्ण कुटुंबाची धम्माल या पोस्टरमध्ये आपल्याला दिसून येते. थोडक्यात काय तर, 'फुगे' हा कम्प्लीट फेमिली पॅकेज सिनेमा असल्याचे हा पोस्टर सांगतो. इंदरराज कपूर प्रस्तुत तसेच एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार, अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी ह्यांनी ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित हा चित्रपट रंगीबेरंगी फुग्यांप्रमाणे रसिकांचे मनसोक्त मनोरंजन करेल, यात शंका नाही. 

सर्व पहा

अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'चा विनोदी ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात ३० हून अधिक मुख्य आणि सहाय्यक कलाकार

हास्य आणि गावाकडच्या वास्तवाचा अनोखा संगम असलेल्या 'ग्राम चिकित्सालय सीझन २' चा ट्रेलर प्रदर्शित झाला

आमिर खान प्रॉडक्शन्स आणि 'लगान'ला २५ वर्षे पूर्ण आमिर खान भव्य पार्टी देणार, संपूर्ण कलाकार आणि क्रू उपस्थित राहणार

2026 आणि 2027 मध्ये आपल्या पदार्पणासह बॉलिवूडमध्ये एंट्री करणार हे नवे चेहरे

श्रद्धा कपूरच्या नवीन चित्रपट 'ईथा'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

सर्व पहा

कर्करोगाशी झुंज देणाऱ्या दीपिका कक्करने इम्युनोथेरपीचा परिणाम, तीव्र अंगदुखी आणि तापाबद्दल सांगितले

छावा'फेम अभिनेत्री संचिता उगले ने संपवलं जीवन

वेलकम टू द जंगल' हा IMDb वरील सर्वाधिक अपेक्षित चित्रपट ठरला असून, ट्रेलरला ४८ तासांत २८ दशलक्ष व्ह्यूज मिळाले

ब्राझीलमध्ये दोन हेलिकॉप्टरची समोरासमोर टक्कर; प्रसिद्ध गायक ऑलिव्हर ट्री यांचे अपघातात निधन

गदर'ने विक्रम रचला! प्रेक्षकसंख्येच्या आकडेवारीबाबत अमिशा पटेलचा धाडसी दावा

पुढील लेख
Show comments