सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 27 ऑगस्ट 2023 (14:42 IST)

Gashmeer Mahajani: वडिलांच्या मृत्यू नंतर गश्मीर महाजनीने केला मोठा खुलासा

Gashmeer Mahajani
social media
Gashmeer Mahajani: सिने सृष्टीतील ज्येष्ठ  नेते अभिनेता रवींद्र महाजनी यांचं महिन्याभरापूर्वी निधन झालं. तळेगाव दाभाडेतील राहत्या घरात त्यांचे मृतदेह आढळले. ते तळेगावात एकटेच राहत होते. त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या मुलाला गश्मीरला मिळाल्यावर तो तातडीनं तळेगावात आला. अनेकांनी गश्मीरवर नाराजी व्यक्त केली होती. 

रवींद्र महाजनी एकटे का राहायचे हा प्रश्न सर्वांसमोर उद्भवत होता. त्यावर खुलासा करत गश्मीर यांनी सांगितले आहे. गश्मीर म्हणाला माझ्या वडिलांनी 20 वर्षांपूर्वी स्वतःच एकटे राहण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही एक कुटुंब म्हणून काहीही करू शकलो नाही.त्यांच्यावर कोणतीही सक्ती केली नाही.  ते अधून मधून त्यांच्य्या इच्छेनुसार आमच्यासोबत राहायला यायचे.  त्यांना स्वतःची कामे स्वतः करायची आवड होती.

केअर टेकरही देखील जास्तकाळ टिकत न्हवता. गेल्या तीन वर्षांपासून बाबांनी स्वतःला सगळ्यांपासून आणि कुटुंबापासून वेगळं केलं होत. मित्रांसोबत वॉक करणं, बोलणं बंद केलं होत. हेच करणं होते की त्यांच्या मृत्यूची बातमी आम्हाला उशिरा समजली. आमच्या कुटुंबातील नातं खराब होण्याची अनेक कारणे होती. ते माझे बाबा होते. या हुन अधिक मला काहीच सांगता येणार नाही. 
 



Edited by - Priya Dixit