शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 11 एप्रिल 2017 (22:09 IST)

हृतिक रोशनने केली ‘हृदयांतर’ ची घोषणा

hritvik roshan in hrudayantar
विक्रम फडणीसच्या ‘हृदयांतर’ चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल ठेवणा-या हृतिक रोशनने चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली. विक्रम फडणीस प्रॉडक्शन आणि यंग बेरी एन्टरटेन्मेट  निर्मित, आणि विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटामध्ये सोनाली खरे, मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘बॉलिवूडचा ग्रीक गॉड’ म्हणून संबोधल्या जाणा-या हृतिकने सोशल नेटवर्किंग साइटवरून ‘हृदयांतर’ (Hrudayantar) चित्रपटाच्या रिलीजची तारीख ९ जून २०१७ असल्याचं जाहीर केले.
 
त्याने ट्विट करताना म्हटले, “ मी ज्या सिनेमाचा हिस्सा आहे. त्या सिनेमाच्या रिलीजची तारीख जाहीर करताना मला आनंद होतोय. ‘हृदयांतर’ हा चित्रपट माझा मित्र विक्रम फडणीसने दिग्दर्शित केला आहे”.