शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 (08:25 IST)

किरण मानेंची ‘बिग बॉस मराठी’मधील कविता व्हायरल

kiran mane
किरण माने सध्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाले आहेत. बिग बॉसच्या घरात दाखल झाल्यापासून किरण माने यांच्या नावाची चर्चा सातत्याने आहे. घरातील सदस्यांच्या मते किरण माने हे सर्वात धूर्त खेळाडू आहेत. काही सदस्यांनी तर उघड- उघड हे बोलूनही दाखवलं आहे. घरातील प्रत्येक टास्कमध्ये ते स्वतःची वेगळी योजना आखतात आणि त्यानुसार खेळताना दिसतात. नुकताच बिग बॉसच्या घरात एक टास्क देण्यात आला होता ज्यात किरण माने यांनी एक कविता सादर केली.
 
किरण माने यांनी नुकत्याच झालेल्या एका टास्कमध्ये बिग बॉसच्या घरातील सदस्यांसमोर गर्लफ्रेंडसाठीची कविता सादर केली. त्यांच्या या कवितेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्या या व्हिडीओला चाहते आणि युजर्सचा जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा व्हिडीओ कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

कलर्स मराठीने किरण माने यांचा हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘प्रेयसीचं लग्न ठरल्यावर प्रियकराची होणारी अवस्था, किरण माने यांनी कवितेच्या माध्यमातून सदस्यांसमोर मांडली’ किरण माने यांनी या कवितेचं अप्रतिम सादरीकरण केलं. त्यांनी सादर केलेल्या या कवितेला घरातील सदस्यांनीही तेवढाच उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. त्यांच्या कवितेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
 
किरण माने यांची कविता…
अगं आयुष्यातलं सुख सारं तुझ्यामागून पेरलं
असं कसं अवचित सखे लगीन तुझं ठरलं
अगं मी- मी म्हणणारं माझ्यापुढे हरलं
तुझ्यासाठी कित्येकांना चितपट मी मारलं
तवा होतं फकस्त मलाच तू वरलं
मग सांग तुझं डोळं असं कशानं गं फिरलं
आसं कसं अवचित सखे लगीन तुझं ठरलं
 
नगं सांगू काय आता सारं मला समजलं
वाटलं होतं सोनं पण पितळच निपाजलं
अगं तुझ्या साखरपुड्याचं पेढं तुझ्या भावानंच मला चारलं
आसं कसं अवचित सखे लगीन तुझं ठरलं
 
साखरेचं पेढं मला मिठासारखं वाटलं
न झोपताच डोळं माझं आपोआप मिटलं
वाटलं, तुझ्या वरातीचं घोडं माझ्या उरावरून फिरलं
आसं कसं अवचित सखे लगीन तुझं ठरलं
 
आयुष्यातलं सुख सारं तुझ्यामागून पेरलं
आसं कसं अवचित सखे लगीन तुझं ठरलं

Edited By- Ratnadeep Ranshoor