मराठी अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मराठी अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर झाला आहे. ठाणे कोर्टाने केतळी चितळेला जामीन मंजूर केला आहे. महिन्याभरापासून ती कारागृहात होती.
टीव्ही मालिकांमधील अभिनेत्री केतकी चितळे हिने तिच्या फेसबुक खात्यावर शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकुर प्रसारित केला होता. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट एकने केतकीला नवी मुंबईतील कळंबोली येथून अटक केली होती.