Marathi Biodata Maker
✕

रणवीर सिंगने ट्वीटरद्वारे केले 'भिकारी'चे टिजर पोस्टर लाँच

Updated: मंगळवार, 13 जून 2017 (14:51 IST)
 
या सिनेमाचं टिजर पोस्टर पाहताचक्षणी मनात भरतं. छत्री तोंडावर घेऊन एक मनुष्य झोपला असल्याचे चित्र आपल्याला दिसून येते. सुटाबुटात असलेला हा मनुष्य मराठीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी असावा असे वाटते, परंतु छत्रीत त्याचे तोंड झाकले असून, त्याच्या शेजारी भिकारीचं  वाडगं दिसत असल्यामुळे, या टिजर पोस्टरवरील मनुष्य स्वप्नीलच आहे का? आणि त्याची या सिनेमात नेमकी काय भूमिका आहे, असे अनेक प्रश्न पडतात. अशाप्रकारे आपल्याला नकळत संभ्रमात  टाकणा-या या  टिजर पोस्टरने, अल्पावधीतच सोशल साईटवर चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. 
 
स्वप्नीलदेखील या सिनेमाबाबत खूप उत्सुक आहे. आतापर्यतच्या भूमिकेहून अगदी वेगळी अशी भूमिका त्याची यात असल्यामुळे हा चॉकलेट बॉय 'भिकारी' सिनेमामध्ये नेमका काय करणार असेल, हे पाहणे कुतुहलाचे ठरणार आहे.
 
बॉलीवूडचे  आघाडीचे  नृत्यदिग्दर्शक म्हणून ख्याती असलेले गणेश आचार्य यांनी याआधी काही हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. मात्र, मराठीत ते पहिल्यांदाच 'भिकारी' या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे. तसेच गणेश आचार्य आणि शरद देवराम शेलार यांनी मी मराठा फिल्म प्रॉडक्शनची स्थापना करून चित्रपट निर्मितीमध्ये प्रथम पाऊल टाकले आहे. या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद तसेच गीत गुरु ठाकूर यांचे असून, त्यांनी यात अभिनय देखील केला आहे. आई आणि मुलाच्या हळव्या नात्यावर आधारित असलेल्या या सिनेमात रुचा इनामदार, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे, कीर्ती आडारकर, सुनील पाल आणि प्रदीप काबरा अशी तगडी स्टारकास्टदेखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. 
 
शिवाय तब्बल एक हजार कलाकारांचा सहभाग असलेले 'गजानना' हे भव्य गाणे देखील या सिनेमाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. गणेश आचार्य यांनी कोरियोग्राफ केलेले हे गाणे बॉलीवूडच्या गाण्यांना लाजवेल अशा धाटणीचे असून, मराठी गाण्यांच्या चित्रीकरणात ते 'सुपरसॉंग' ठरणार असल्याचा निकष देखील लावला जात आहे.  छायाचित्रकार महेश लिमये यांच्या कॅमे-यातून 'भिकारी' सिनेमा साकार झाला असल्यामुळे चित्रीकरणात देखील तो समृध्द ठरला आहे.  या चित्रपटाचा आशय, बांधणी आणि निर्मितीमूल्य पाहता 'स्वामी तिन्ही जगाचा... भिकारी' हा सिनेमा २०१७ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांमधला एक महत्वपूर्ण आणि बिगबजेट सिनेमा ठरणार, यात शंका नाही.

सर्व पहा

केदारनाथ येथे पूजा केल्याबद्दल सारा अली खान यांच्या विरोधात फतवा जारी

भेडिया २' आणि 'ऑब्सेशन'च्या आधी वरुण धवन आणि क्रिती सॅनॉन पुन्हा एकत्र दिसणार

'रामायण' भारताचा इतिहास आणि संस्कृती जगासमोर आणेल; नमित मल्होत्रा ​​यांचा चित्रपट १०० हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार

अनुष्का शर्मा तिसऱ्यांदा गरोदर आहे का? विराट कोहलीसोबत कीर्तनात सहभागी झाल्यानंतर चर्चांना उधाण

"उत्तम पती आणि पिता, पण रोमान्ससाठी वेळ नाही!"; विकी कौशलबाबत कॅटरिना कैफचे वक्तव्य चर्चेत

सर्व पहा

एक दिवसाची दिवाळी सहल; सकाळी जाऊन रात्री परतता येतील अशी ठिकाणे

रणबीर कपूरच्या 'रामायण ने ॲडव्हान्स बुकिंग मध्ये कमावले एवढे रुपये, चित्रपटाची लोकप्रियता भारतापासून अमेरिकेपर्यंत...

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

मार्व्हल विसरून Gen Z पडणार 'रामायण'च्या प्रेमात! रणबीर कपूरचा सिनेमा मोडणार कमाईचे सर्व रेकॉर्ड?

'हनुमान अंश'ने कोट्यवधी रुपये कमावल्यानंतर, आता चित्रपटाच्या हक्कांवरून निर्मात्यांमध्ये वाद

पुढील लेख
Show comments