Marathi Movie boyz : किशोरावस्थेवर भाष्य करणार 'बॉईज' सिनेमा

marathi movie
'बॉईज'...!
या नावातच बरेच काही असणारा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येत आहे. या सिनेमात किशोरवयीन मुलाचे अनेक पैलू मांडण्यात आले आहे. त्याच किशोरवयीन मुलांच्या गमतीजमती,
त्यांचा
प्रत्येक गोष्टींमध्ये बघण्याचा आयाम,
या सर्व गोष्टींवर हलकेफुलके भाष्य आपल्याला
या सिनेमातपाहायला मिळणार आहे.
'आजोबा'
तसेच
'कॉफी आणि बरंच काही'
या चित्रपटांच्या यशस्वी निर्मितीनंतर
सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली;
लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे हे निर्माते पुन्हा
'बॉईज'
हा सिनेमा आपल्यासमोर घेऊन येत आहे.
या चित्रपटाचा मुंबईत लोअर परेल येथे,नुकताच मोठ्या दिमाखात
टिजर पोस्टर
लाँच
करण्यात आला.
तीन मित्रांचा पाठमोरा लुक असणारा हा टिजर पोस्टर पाहताना हा सिनेमा कम्प्लीट युथ इंटरटेनिंग सिनेमा असल्याचे लक्षात येते. तुर्तास या टिजर पोस्टरमधली तीन मुले कोण आहेत हे गुपितच ठेवण्यात आली असून,
खुद्द सनी लिओनी या सिनेमातील एका गाण्यात थिरकली
आहे;सुनिदी चौहानच्या आवाजातील हे गाणे सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांनी कॉरीओग्राफ केले असल्यामुळे
प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच
वाढली आहे.

marathi movie

या चित्रपटाची आणखीन एक खासियत म्हणजे,
आतापर्यत एकविरा प्रॉडक्शनअंतर्गत सिने-दिग्दर्शक संगीत-दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या भूमिकेत दिसणारे अवधूत गुप्ते आपल्याला
''बॉईज'
या सिनेमाद्वारे प्रथमच प्रस्तुतकर्ते म्हणून पाहायला मिळणार आहेत. तसेच अनेक यशस्वी चित्रपटातून
सहदिग्दर्शकाची जबाबदारी पेलणारे विशाल देवरुखकर प्रथमच दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटात
'बॉईज'
द्वारे आपले पदार्पण करत आहेत.

या चित्रपटात संतोष जुवेकर,
झाकीर हुसेन,
शिल्पा तुळसकर,
शर्वरी जमिनेस आणि वैभव मांगले या कलाकारांची भूमिका आहे. घरापासून दूर हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या युवा पिढीची दुनिया यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून,
सिनेमाच्या टिजर पोस्टरवरील ही तिकडी लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. किशोरवयीन मुलांची धुडगूस,
मौजमज्जा
आणि
प्रेम दाखवणारा हा सिनेमा युथ फेस्टिवल महिना म्हणून प्रचलित असलेल्या ऑगस्टमध्ये महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

कतरिना ने सांगितलं सलमानच्या लग्नाबद्दल, व्हिडीओ तुफान ...

कतरिना ने सांगितलं सलमानच्या लग्नाबद्दल, व्हिडीओ तुफान व्हायरल
मोस्ट एलिजिबल बॅचलर ऑफ बॉलीवूड ज्याच्या लग्नाची सर्वच आतुरतेने वाट बघत आहे. होय आम्ही ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’ पुन्हा ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’  पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
लॉकडाउनमुळे ८० आणि ९०च्या दशाकातील दूरदर्शन वाहिनीवरील मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात ...

ब्लॅक विडोची 'या' दिवशी रिलीज होणार

ब्लॅक विडोची 'या' दिवशी रिलीज होणार
कोरोनामुळेअनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. हॉलिवूड इंडस्ट्रीवरही याचा परिणाम झाला आहे. ...

कनिका कपूर करोनामुक्त

कनिका कपूर करोनामुक्त
गायिका कनिका कपूरला अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. शनिवारी तिचा सहावा रिपोर्ट ...

शाहरुख आणि पत्नी गौरी अशी करत आहेत मदत

शाहरुख आणि पत्नी गौरी अशी करत आहेत मदत
करोनाविरोधातील लढाईसाठी बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान पुढे आले आहेत. ...