शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 2 मार्च 2019 (12:18 IST)

अभिनय करतोय का हेमलला डेट?

Movie Teaser
'अशी ही आशिकी' या सिनेमात दिसणारी हेमल आणि अभिनय या जोडीमधील केमिस्ट्री आता ऑफ स्क्रिनवर पण दिसत आहे. मराठी सिनेसृष्टीतील हे नवीन लव्ह बर्डस्‌ आहेत का? असे बोलले जात आहे. इतकेच नव्हे तर या सिनेमातील स्वयम आणि अमरजा या ऑनस्क्रिन जोडीची भूमिका साकारणारे अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे रिअल लाईफमध्ये एकमेकांना डेट तर करत नाहीत ना? असा प्रश्र्न अनेकांना पडला आहे. कारण ही नवीन जोडी प्रोशनदरम्यान जरा जास्तच एकत्र रुळली, त्यांच्या हावभावातून ते पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत, असे कुठेही जाणवत नाही. तसेच प्रोशनदरम्यान अभिनय आणि हेमलमध्ये तयार झालेली जवळीक यामुळे आणि त्यांचे काही फोटोस्‌ व्हायरल झाल्यामुळे ते डेट करत आहेत, अशी चर्चा रंगत आहे. पण सध्या दोघेही या विषयावर काही बोलू इच्छित नसल्यामुळे खरे काय ते अजून कळलेले नाही.