सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 जून 2021 (12:21 IST)

'मुलगी झाली हो' महाराष्ट्राची नंबर 1 मालिका

मराठी मालिक आणि त्यांच्या कलाकारांना नेहमीच प्रेक्षकांचा प्रेम आणि प्रतिसाद लाभत असतो. अनेक मालिका सोशल मीडियावर चर्चेत असतात. नवीन ट्विस्ट, नवीन कलाकार, प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात यशस्वी ठरतात. तर चला जाणून घ्या कोणती मालिका नंबर 1 ठरली आहे ते- 
 
टीआरपीच्या यादीत सतत वर असलेली 'आई कुठे काय करते' या मालिकेला जोरदार धक्का बसला आहे. ही मालिका आता टॉप 5 मधूनही बाहेर पडली असून इतर मालिकांना जागा भरली आहे. 
 
टीआरपीच्या यादीत स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर 'सुख म्हणजे नक्की काय असतं?' ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर तर 'रंग माझा वेगळा' ही मालिका तिसऱ्या स्थानी आहे. झी मराठी वाहिनीवरील 'देवमाणूस' ही मालिका चौथ्या क्रमांकावर आहे. तर 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका पाचव्या क्रमांकावर आहे. 
 
मुलगी झाली हो ही मालिका एक बालिका साजिरी (माऊ) बद्दल आहे जिला जन्मतः नाकारले जाते. तिचे वडील विलास तिच्या आई उमाला तिच्या गरोदरपणात काही विष देतात कारण त्यांना असे वाटते की तिला दुसर्‍या मुलीचे पैसे देणे परवडत नाही. याचा परिणाम म्हणजे मुलगी मुकी जन्माला येते. मुलगी झाली हो ही मालिका स्टार प्रवाहवर 2 सप्टेंबर 2020 पासून प्रसारित होते. शर्वाणी पिल्ले, दिव्या पुगांवकर, योगेश सोहोनी हे मुख्य भूमिका साकारत आहेत.