शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 6 नोव्हेंबर 2023 (10:54 IST)

प्रथमेश-मुग्धाच्या साखरपुड्याचे फोटो

prathames mugdha
Instagram
काल रविवारी 5 नोव्हेंबर रोजी मुग्धा आणि प्रथमेशच्या साखरपुड्याचा सोहळा पार पडला. अतिशय साधेपणाने आणि मोजक्या नातेवाईक मित्रमंडळींच्या समवेत त्यांचा हा साखरपुडा संपन्न झाला. ना कुठला जास्तीचा मेकअप , भरजरी साड्या आणि नाही कुठला गाजावाजा यामुळेच त्यांचा हा सोहळ्यातील साधेपणा चाहत्यांना विशेष भावला. साधी नारंगी लाल रंगाची साडी नेसलेली मुग्धा त्या पेहरावात सुद्धा खूपच सुंदर दिसत होती. तर प्रथमेशने देखील नेहमीप्रमाणेच एक लाल रंगाचा साधा कुर्ता परिधान केला होता. गावच्या कुशीत आणि निसर्गाच्या सानिध्यात त्यांचा हा साखरपुडा संपन्न झाला.या साखरपुड्या नंतर दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकताना पाहायला मिळणार आहेत.
 
लोकप्रिय मराठी रिअॅलिटी टीव्ही शो सा रे ग म प लिल चॅम्प्स फेम गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायम यांनी अलीकडेच सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. हे जोडपे आता लग्नाच्या तयारीत आहे आणि त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर त्यांच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

त्यांच्या प्रेमकथेबद्दल बोलताना मुग्धा आणि प्रथमेश म्हणाले की ते सारेगमपा लिटिल चॅम्प्सच्या काळापासून एकमेकांना ओळखतात आणि गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
 
मुग्धाने एका YT व्हिडिओमध्ये तिच्या चाहत्यांना सांगितले की, "आम्ही एकमेकांना सा रे ग मा प लिएल चॅम्प्सपासून ओळखतो. लिल चॅम्प्स ऑफ एअर झाल्यानंतरही आम्ही दोघांनी अनेक शो एकत्र केले आहेत. यापूर्वी आम्ही चांगले मित्र होतो. आणि आम्हा दोघांना एकमेकांची ट्यूनिंग होती. आधी आमच्यात संगीताचे सूर जुळले आणि नंतर आमचे विचार जुळले. आम्ही गेल्या 4 वर्षांपासून अधिकृतपणे एकमेकांना डेट करत आहोत. प्रथमेश म्हणाला की त्याने मला प्रपोज केले होते. इतक्या लवकर काहीही झाले नाही आणि सर्वकाही हळूहळू झाले. ."