Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'गं सहाजणी'त सांगणार प्रशांत दामले भविष्यवाणी!

Updated: गुरूवार, 8 डिसेंबर 2016 (17:37 IST)
ज्योतिषशास्त्राच्या या विशेष भागात नाट्यसृष्टीचे नावाजलेले कलाकार प्रशांत दामले रसिकांसमोर येणार आहेत. पैसा हातात टिकत नाही म्हणून त्रासलेले एम.यू. पी. बी. बँकेचे  मॅनेजर धबडगावकर यांना शिपाई सावंत ज्योतिषांचा सल्ला घेण्याचे सुचवतो. सावंत यांच्या ओळखीचे ज्योतिषी (प्रशांत दामले) धबडगावकरांच्या मदतीसाठी सहाजणीच्या बँकेत येतात. ज्योतिष विद्येत पारंगत असणारे प्रशांत दामले धबडगावकरांच्या शंकेचे निरसन करतात, पण त्यासोबतच सहाजणीमधील कामिनीच्या भूतकाळ आणि वर्तमानकाळाचे अचूक निदान करत सर्वांना अचंबित करतात. अशावेळी बँकेतील सर्वजण आपापले भविष्य जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे धावतात. वर्तमानाचा विसर पडून माणसे भविष्य जाणून घेण्यास किती आगतिक होतात हे या भागात पाहायला मिळणार आहे.
मुळात, ज्योतिषशास्त्र हे नेमके काय असते याचे कुतूहल सामान्य लोकांमध्ये आजही आहे, आपले भविष्य जाणून घेत त्याची अंमलबजावणी करण्याच्या नादात वर्तमानाकडे दुर्लक्ष करणारी अनेक माणसे आपण पाहत असतो. स्व: सामर्थ्याला दुय्यम लेखून केवळ भाकितावर भविष्य घडवण्याचा प्रयत्न करणा-या अशा या माणसांना किती फायदा आणि नुकसान होते? हे या भागात पाहायला मिळणार आहे.
 
ज्योतिषशास्त्राच्या या विशेष भागात प्रशांत दामले गं सहाजणींच्या ताफ्यात काय भविष्यवाणी करतायत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भविष्यवेधाचा हा खेळ मंगळवार दि. १३ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

सर्व पहा

महान गायिका आशा भोसले यांचा आवाज पुन्हा घुमणार, अखेरचे गाणे या खास दिवशी प्रदर्शित होणार

चंद्रचूड सिंह यांचा नातेवाईकांवर कोट्यवधी रुपयांची वडिलोपार्जित जमीन बळकावल्याचा आरोप एफआयआर दाखल

अमिताभ बच्चन यांना आयएफएस अधिकारी व्हायचे होते, केबीसीच्या नव्या एपिसोडमध्ये खुलासा केला

जेव्हा नेहा धुपियाने करण जोहरला तीन वेळा लग्नाची मागणी घातली, पण प्रत्येक वेळी तिला एकच उत्तर मिळालं

एकता कपूरच्या चित्रपटातून गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा डेब्यू करणार

सर्व पहा

सोनू सूद नेपाळमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले, म्हणाले – मदतकार्य सुरूच राहील

Disha Salian Death Case सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी सीबीआय करणार

ईशा देओल विनोदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार! अभिनेत्री दिसणार या चित्रपटात

उंचच उंच थर आणि कोट्यवधींची बक्षीसे! जाणून घ्या महाराष्ट्रातील टॉप दहीहंडी ठिकाणे

शुगर डॅडी' वादाच्या पार्श्वभूमीवर, गोविंदा पहिल्यांदाच एखाद्या रिॲलिटी शोमध्ये दिसणार!

पुढील लेख
Show comments