suvichar
✕

"अश्या ह्या दोघी" रंगमंचावर पुन्हा अवतरणार

Updated: सोमवार, 27 फेब्रुवारी 2017 (16:43 IST)
पुरुषी अहंकारासमोर होत असलेली स्त्री भावनांची कुचंबना मांडणारे हे व्यावसायिक नाटक १९ व्या शतकात मराठी रंगभूमीवर चांगलेच गाजले होते. या नाटकाचा विषय आणि त्याची झालेली प्रसिद्धी लक्षात घेता,  न मिता गिरकर यांच्या प्रचीती निर्मिती संस्थेअंतर्गत पुनश्च रंगमंचावर अवतरत असलेले हे नाटक नाट्यरसिकांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे. नुकताच या नाटकाचा लेखक गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते मुहूर्त संपन्न  झाला. दिग्दर्शक प्रशांत गिरकर यांच्या दिग्दर्शनाखाली   हे नाटक आता नव्याने प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाले असून कलाकारांची नावे सध्या गुपितच ठेवण्यात आले आहे. 
 
प्रशांत गिरकर यांनी यापूर्वी २००९ साली प्रदर्शित झालेल्या ईश्य या मराठी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच हिंदी आणि मराठीच्या छोट्या पडद्यावर देखील त्यांचा हातखंडा पाहायला मिळतो. "पुत्रकामेष्ठी  ही  त्यांनी दिग्दर्शित केलेली पहिली मालिका आहे. या मालिकेद्वारे प्रशांत गिरकर यांनी डेली सोपचा पायंडा घातला. यानंतर त्यांनी 'स्वामी समर्थ', 'रेशीमगाठी' 'समांतर' यांसारख्या मराठी तर 'साहब बीबी और टीव्ही' आणि "गुब्बारे" अशा हिंदी मालिकांचे त्यांनी दिग्दर्शन केले असून 'कोण कोणासाठी', 'चौदा एके चौदा' या नाटकांच्या दिग्दर्शनाचा अनुभवसुद्धा त्याच्या गाठीशी आहे, त्यामुळे 'अश्या ह्या दोघी' हे नाटक नव्याने जिवंत करण्याचे सामर्थ्य ते ठेवतात. शिवाय त्यांच्या  कर्टन रेझर अकादमी ऑफ फिल्म अँड थिएटरे या अभिनय प्रशिक्षण कार्यशाळेअंतर्गत नवकलाकारांना अभिनयाचे धडे देखील मिळत आहे. त्याचप्रमाणे 'रफूचक्कर' आणि 'वणवा'  हे दोन आगामी सिनेमे लवकरच आपल्याला पाहायला मिळतीलe. अशाप्रकारे चित्रपट, मालिका आणि नाटक या अभिनयाच्या तिन्ही क्षेत्रांमध्ये दिग्दर्शनाची मोठी धुरा सांभाळणारे प्रशांत गिरकर यांचे 'अश्या ह्या दोघी' हे नाटक येत्या ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  

सर्व पहा

अमिताभ बच्चन यांच्या नावावर खास गिनीज विक्रम; मादाम तुसादमध्ये स्थान मिळवणारे ठरले पहिले भारतीय अभिनेते!

बिगबॉस' फेम अभिनेत्री अर्चना गौतमच्या कॅफेमध्ये चोरी

सिद्धार्थ-कियारा पुन्हा आई-बाबा होणार

जान्हवी कपूरने तिच्या हिवाळी लूकने खळबळ उडवून दिली, बोल्ड स्टाईल आणि मनमोहक पोझने सर्वांचे लक्ष वेधले

सलमान खानने आपले नवीन यूट्यूब चॅनल 'बीइंग द सलमान खान' सुरू केले; चाहत्यांना अभिनय आणि त्याचा स्वॅग शिकवणार

सर्व पहा

Jailer 2 Movie Review 'जेलर २' मध्ये रजनीकांत यांचा पुन्हा धुमाकूळ; पाहण्यापूर्वी हा रिव्ह्यू नक्की वाचा!

आमिर खानचा पुतण्या अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस; देश सोडण्याचे अल्टीमेटम

'रामायणा'तील जटायूची पहिली झलक समोर आली! अनुपम खेर यांच्या आवाजातून धर्म आणि शौर्याचा संदेश दिला जात आहे

१८ महाशक्तीपीठांपैकी एक मैसूरची चामुंडेश्वरी देवी आणि दसरा उत्सवाचे धार्मिक महत्त्व

कपाळावर टिळा लावल्यामुळे एकता कपूर ट्रोल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments