गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 डिसेंबर 2023 (11:07 IST)

प्रितम-अंजलीची बांधली जाणार लग्नगाठ

marathi movie
कलर्स मराठीवरील ‘काव्यांजली- सखी सावली’ ह्या मालिकेमध्ये सध्या अंजली प्रितमच्या लग्नाची तयारी सुरु आहे. मालिकेच्या सुरुवातीपासून आपण अंजली प्रितमची घट्ट मैत्री बघत आलो आहोत. अखेर अंजलीला तिच्या स्वप्नातला राजकुमार, प्रितमच्या स्वरूपात मिळणार आहे. एकेकाळी मैत्रीचे प्रतीक असलेले प्रितम आणि अंजली आता एकमेकांचे जीवनसाथी बनणार आहेत. प्रितांजलीच्या मेहंदी, हळदीचा कार्यक्रम आणि लग्नासाठी घरातले तर उत्सुक आहेतच त्याचबरोबर रमा-राघव, राज-कावेरी, आणि अर्जुन-सावी सुद्धा प्रितांजलीच्या मेहेंदी हळदी कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. लवकरच अंजली आणि प्रितमचा पारंपरिक लग्न सोहळा पार पडणार आहे. हा लग्नसोहळा सर्वांसाठीच आनंदाचा असणार आहे. तरीही एकीकडे सुनंदा आणि आशु हे लग्न न व्हावं म्हणून प्रत्येक प्रयत्न करणार आहेत. तर दुसरीकडे विश्वजीत आणि श्रेष्ठाचं सत्य कळल्यावर काव्याला मोठा धक्का बसला आहे. तरीही तिच्या बहिणीच्या लग्नासाठी ती सगळं दुःख बाजूला करून आनंदाने, उत्साहाने या लग्न सोहळ्यात सामील होणार आहे, कारण आजवर तिने अंजलीसाठी पाहिलेलं एकमेव स्वप्नं आता पूर्ण होणार आहे. पण ह्या स्वप्नाला कोणाची दृष्ट लागणार? की हे स्वप्नं पूर्ण होणार? हे पाहण्यासाठी, बघा काव्यांजली - सखी सावली, प्रितम-अंजलीचा लग्नसोहळा, २ तासाचा महारविवार, १० डिसेंबर, दु. १२.०० आणि संध्या. ७.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.