suvichar

'ग सहाजणी' त पुष्कर श्रोत्री आणि जयवंत वाडकर यांची दे धमाल

शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 (10:42 IST)
स्टार प्रवाह वाहिनीवरील  'ग सहाजणी' या विनोदी मालिकेत सध्या दे धमाल घटना घडत आहे. विशेष म्हणजे या घटनांमध्ये अनेक सेलिब्रिटी कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकत्याच दिवाळी सणानिमित्त झालेल्या ग्रँड महाबोनस सेलिब्रेशन नंतर मंजुळाबाई उसने परतफेड बॅंकेतल्या  एका थरारक घटनेत पुष्कर श्रोत्री आणि जयवंत वाडकर हे  लोकप्रिय कलाकार प्रेक्षकांना वेगळ्या रुपात दिसणार आहेत.

दिवाळी सणाच्या उत्साहात संपूर्ण एमयुपी बॅंक असताना तीन संशयित आरोपी दरोड्याच्या हेतूने बॅंकेत घुसतात. याच दरम्यान पोलीसही तिथे येतात. मग त्यानंतर चोर आणि पोलीसांचे थरारनाट्य सुरु होते. या थरारनाट्यात पोलीस  दरोडेखोऱ्यांना पकडण्यात यशस्वी होतात का? मालिकेतील सहाजणी या प्रसंगाला कश्या सामोऱ्या जातात, हे पाहणे मजेशीर ठरणार आहे. 

या भागात सहाजणी नेमक्या कोणाला पकडतात, नेहमीच काहीतरी गोंधळ करत बॅंकेत समस्या निर्माण करणाऱ्या या सहा मैत्रिणीमुळे नेमका कोणाला फायदा होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. चोर-पोलिसांचा हा मजेशीर भाग ६ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांना पाहता येणार असून यात  पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, गणेश  रेवंडेकर आणि चंदू बारशिंगे हे लोकप्रिय कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवायला येणार आहेत. 

सर्व पहा

कॉकटेल २ चित्रपट समीक्षा: सुंदर वेष्टनात सादर केलेली एक कमकुवत प्रेमकथा

साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले

'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचे ४२ लाख रुपयांचे बिल शाहरुख खानने माफ केले; चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला

3 इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी, राजकुमार हिरानी यांनी कथेचे गुपित उघड केले

'वेलकम टू द जंगल'मध्ये नवीन गाणे प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या आवाजाने 'दिवाने हैं' हा सुपरहिट ट्रॅक झाला

सर्व पहा

'द इंडिया स्टोरी'चा टीझर प्रदर्शित, काजल अग्रवाल-श्रेयस तळपदेने कीटकनाशक शेतीचे भीषण सत्य उघड केले

जेव्हा कार्तिक आर्यन एका चुंबनासाठी ३७ रिटेक्स द्यावे लागले

अभिनेत्रीच्या घरी तरुणाचा मृतदेह आढळला

वेलकम टू द जंगल' मधील रोमँटिक गाणे 'ओ मेरे बलम' प्रदर्शित झाले

गोठलेली सरोवरे, निळे महासागर; भारतातील नैसर्गिक ठिकाणे, जेथील दृश्ये रहस्यमय अनुभव देतात!

पुढील लेख
Show comments