शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

सई ताम्हणकरच्या ड्रायव्हारला बेल्ट आणि बांबूच्या काठीने बेदम मारहाण

Sai Tamhankar
मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरच्या ड्रायव्हरला भर रस्त्यात मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
 
सई ताम्हणकरचा ड्रायव्हर सद्दाम मंडल (वय 32) याला हॉर्न वाजवल्यामुळे बेदम मारहाण करण्यात आली. मालवणीच्या अंबुजवाडी येथे ड्रायव्हरला चार जणांनी बेल्ट आणि बांबूच्या काठीने बेदम मारहाण केली. या प्रकरणात पोलिसांनी मारहाण केलेल्या चौघांविरोधात तक्रार केली आहे.
 
सद्दाम मंडल सहा वर्षांपासून सईकडे ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहे. 13 ऑगस्ट रात्री दहाच्या सुमारास कामावरुन घरी परतताना हा प्रकार घडला.
 
रात्री दहा वाजता सद्दाम दुचाकीने परत येत असताना अंबुजवाडी परिसरात एक व्यक्ती गाडी वाकडी- तिकडी पळवत असताना सद्दाम यांनी हॉर्न वाजवला. हॉर्न वाजवल्याने त्या व्यक्तीला राग आला आणि त्याने शिवीगाळ करण्यास सुरवात केली. नंतर मागे असलेल्या बाईकवरून दोन जण आले आणि सर्वानी लाकडी बांबू आणि बेल्टने त्यांच्यावर हल्ला केला.
 
नंतर मंडल कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी गेले. उपचारानंतर त्यांनी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.