प्रसाद ओकच्या घरात सनई-चौघडे: अभिनेत्याची होणारी सून मारवाडी; सोशल मीडियावर साखरपुड्याच्या फोटोंची चर्चा
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांचा मोठा मुलगा सार्थक ओक याचा साखरपुडा नुकताच पार पडला असून या सोहळ्याला मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. सध्या सोशल मीडियावर या सोहळ्याच्या फोटोंची मोठी चर्चा आहे. प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांच्या पारंपरिक लूकचेही चाहत्यांनी खूप कौतुक केले आहे. साखरपुड्याला अमृता खानविलकर, समीर चौगुले, स्वप्नील जोशी सारखे अनेक कलाकार उपस्थित होते.
प्रसाद ओक हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि बहुगुणी व्यक्तिमत्त्व असल्यामुळे त्यांच्या मुलाच्या लग्नाची बातमी चाहत्यांमध्येही उत्सुकता निर्माण करणारी ठरली आहे. तसेच सार्थकच्या होणाऱ्या पत्नीचे नाव रितू असून, ती मारवाडी कुटुंबातील आहे.
मंजिरी ओक यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की, सून जरी अमराठी असली तरी तिने ओक कुटुंबाशी आणि त्यांच्या संस्कृतीशी खूप छान जुळवून घेतले आहे. साखरपुड्याच्या दिवशी रितूने त्यांना “काकू” म्हटल्यावर तिची आई ओरडली. पण मंजिरींनी हसत हसत सांगितले, “आई एकच असते जन्म देणारी. मला आई म्हणण्यासाठी जबरदस्ती नको. मनात आईसारखी भावना असेल तर पुरे.”
तसेच सध्या तरी लग्नाची तारीख निश्चित झालेली नाही, परंतु प्रसाद ओक यांच्या घरात लवकरच सनई-चौघडे वाजणार हे नक्की!
Edited By- Dhanashri Naik
मराठी अभिनेता प्रसाद ओक यांच्या घरात सध्या आनंदाचं वातावरण आहे. त्यांच्या मुलाच्या लग्नाची लगबग सुरू असून, लवकरच त्यांच्या घरी सनई-चौघडे वाजणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद ओक यांची होणारी सून मारवाडी कुटुंबातील आहे. त्यामुळे हे लग्न दोन वेगवेगळ्या संस्कृतींचा सुंदर संगम ठरणार आहे. सध्या तरी लग्नाची तारीख निश्चित झालेली नाही, परंतु प्रसाद ओक यांच्या घरात लवकरच सनई-चौघडे वाजणार हे नक्की!