मंगळवार, 17 फेब्रुवारी 2026
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 18 मार्च 2017 (10:32 IST)

‘संघर्षयात्रा’ 14 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार

sangharsh yatra
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा बायोपिक ‘संघर्षयात्रा’ सिनेमा 14 एप्रिल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती सिनेमाचे दिग्दर्शक साकार राऊत यांनी दिली. अभिनेता शरद केळकर गोपीनाथ मुंडे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर श्रुती मराठेने पंकजा मुंडे यांची भूमिका साकारली आहे. ओंकार कर्वे प्रमोद महाजन यांच्या तर, प्रवीण महाजन यांच्या भूमिकेत गिरीश परदेशी दिसणार आहे. काही तांत्रिक बाबींमुळे सिनेमाची घोषणा झाल्यानंतरही सिनेमा रिलीज करण्यासाठी वेळ लागला, असं साकार राऊत यांनी सांगितलं. या सिनेमात सुचवलेले काही बदल करण्यात आले आहेत. सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला प्रमाणपत्र दिल्याने प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे, असंही साकार राऊत म्हणाले.