शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 18 डिसेंबर 2023 (10:32 IST)

मालिका नवा गडी नवा राज्य घेणार प्रेक्षकांचा निरोप

Nava Gadi Nava rajya
social media
झी मराठीवर प्रसारित होणारी मालिका 'नवा गडी नवा राज्य' आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.  
काही दिवसांपूर्वी या मालिकेचे शेवटच्या भागाचे शूटिंग झाले. आता ही मालिका 23 डिसेंबर रोजी निरोप घेत आहे. या मालिकेतील कलाकारांनी शुंटिंगचा शेवटचा दिवस आनंदात साजरा केल्याचे व्हिडीओ समोर आले आहे. 

अभिनेत्री श्रुती मराठे आणि अभिनेता गौरव घाटणेकर यांच्या प्रोडक्शन ची निर्मिती असलेली मालिका नवा गडी नवा राज्य 8 ऑगस्ट 2022 पासून सुरु झाली. अनिता दाते -केळकर, पल्लवी पाटील, कश्यप परुळेकर, वर्षा दांदळे असे कलाकार या मालिकेत होते. रमाचा संसार आनंदाने सांभाळणारी आनंदी प्रेक्षकांच्या घरात आणि मनात शिरली. या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली.  

या मालिकेचं शेवटचं शूटिंग 10 डिसेंबर रोजी झालं. त्या वेळी मालिकेतील सर्व कलाकारांनी केक कापून हा दिवस आनंदानं साजरा केला. याचा व्हिडीओ अभिनेत्री वर्षा दांदळे हिने शेअर केला आहे. 
 
Edited By- Priya DIxit