शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 26 फेब्रुवारी 2024 (17:31 IST)

मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेत्याचा लाईव्हमध्ये धक्कादायक खुलासा

ramesh pardeshi
social media
पुण्यातील वेताळ टेकडीवर दोन महाविद्यालयीन तरुणींनी अमली पदार्थांचं सेवन केलेला एक व्हिडीओ समोर आला आहे.मराठी दिग्दर्शक व ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेते रमेश परदेशी यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात दोन तरुणी नशेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

रमेश परदेशी यांनी हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की पुण्याच्या वेताळ टेकडीवर मी व्यायामासाठी गेलो होतो त्यावेळी तिथे दोन महाविद्यालयीन मुली  बिअर, मद्य आणि नशेचे काही सामान घेऊन टेकडीवर एका कोपऱ्यात बसल्या होत्या. त्या पहिला वर्षाच्या मुली होत्या. अलीकडेच पुण्यात तब्बल 4 हजार कोटींचं ड्रग्जचा साठा सापडला आहे. आणि आज मी हे असं घडताना बघितलं. या दोघींपैकी एका मुलीला शुद्धच नाही. आता मी त्यांना दवाखान्यात नेत आहे.रमेश परदेशी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. 
 
वेताळ टेकडीवर मी व्यायामासाठी जातो. आता एवढे कमी वय असलेले मुलं इथे येऊन नशा करतात.त्यांना काही झालं तर त्यांच्या पालकांनी कुणाकडे पाहावं. सध्याची खूप वाईट स्थिती आहे. पुणे हे विद्येचे महेर घर आहे आणि तिथे 4 हजार कोटींचं ड्रग्स सापडणं चिंतेची बाब आहे. सध्या तरुण मुलं मुली पब मध्ये जातात, क्लब मध्ये जातात तिथे नशा करतात. या कडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. पालकांनी आपल्या मुलांकडे जातींन लक्ष देण्याची गरज आहे.असं रमेश परदेशी सांगतात.  
 
 
Edited By- Priya Dixit