शनिवार, 17 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 19 डिसेंबर 2016 (11:54 IST)

‘देवा’ सिनेमासाठी लाभला श्रेयाचा आवाज

shreya in marathi film
अंकुश चौधरीच्या अतरंगी लूक मुळे ‘देवा’ या सिनेमाची सध्या भरपूर चर्चा होत आहे. विशेष म्हणजे ह्या चर्चेला आता नवीन विषय मिळालाय. आणि तो म्हणजे या सिनेमाचे संगीतकार अमितराज याचं गाणं! संगीताचा जादुगार असलेला अमितराजच्या या गाण्याला चक्क श्रेया घोशालचा आवाज लाभला आहे. श्रेया घोशालच्या आवाजातील हे गाणे ‘देवा’ या सिनेमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. या गाण्याचे नुकतेच रेकोर्डिंग झाले आहे.
 
प्रत्येक संगीतकाराचे आपल्या आवडत्या गायकांसोबतकाम करण्याचे स्वप्न असते. अमितराज देखील त्याला अपवाद नाही. मात्र देवाच्या निमित्ताने त्याला त्याची आवडती गायिका श्रेया घोशाल सोबत काम करण्याची संधी मिळाली. ह्या गाण्याला क्षितीज पटवर्धन ह्यांचे गीत लाभले आहे. आता ह्या भन्नाट तिकडी कडून आपल्याला नक्कीच काहीतरी वेगळं ऐकायला मिळेल.
 
इनोव्हेटिव्ह फिल्मस आणि प्रमोद फिल्मस् यांची संयुक्त निर्मिती असलेला हा सिनेमा नवीन वर्षी मनोरंजनाची मेजवानी घेऊन येणार आहे. कोकणात चित्रीकरण झालेल्या या सिनेमाचे साऊथचे सुप्रसिध्द दिग्दर्शक मुरली  नलप्पा यांनी दिग्दर्शन केले आहे. श्रेयाच्या आवाजातील हे गाणे 'देवा' या सिनेमाच्या प्रसिद्धीला चारचाँद लावणारं ठरेल यात शंका नाही.