Marathi Biodata Maker

सोनूने पहिल्यांदा गायिली एकाच सिनेमातील सर्व गाणी

सोमवार, 4 मार्च 2019 (08:53 IST)
गोड गळ्याचा गायक सोनू निगमने आपल्या आवाजानं सगळ्यांच्याच मनात हक्काचं घर केलं आहे. गेली कित्येक वर्षे सोनू निगमची गाणी संगीतप्रेमींना अक्षरशः वेड लावत आहेत. अमराठी गायक मराठी गाणी तितक्याच ठसक्यात कसा गाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे सोनू निगम. आतापर्यंत सोनू निगमने गायलेली सदाबहार गाणी तरुणाईलादेखील भुरळ पाडतात. असा गोड आवाज असलेला आणि तितकाच दिसायलाही गोड असणार्‍या सोनू निगमने पहिल्यांदाच मराठी सिनेमातील सर्व गाणी गायली आहेत. आणि ती गाणी एकापेक्षा एक हटके आणि रोमांटिक आहेत. सोनूचा आवाज किती गोड आणि रोमांटिक आहे हे आपण अनेक गाण्यांतून अनुभवलंय, पण जर 'आशिकी'सारख्या विषयावर आधारित सर्वच गाणी सोनू गाणार म्हणजे तरुण मंडळी पुन्हा एकदा सोनूवर फिदा होणार, हे नक्की. टी-सीरिजची मराठीतील पहिलीच निर्मिती असलेल्या सचिन पिळगांवकर दिग्दर्शित 'अशी ही आशिकी' या सिनेमात सोनू निगमने पहिल्यांदाच मराठी सिनेमासाठी एकाच सिनेमातील सर्व गाणी गायली आहेत.

सर्व पहा

कॉकटेल २ चित्रपट समीक्षा: सुंदर वेष्टनात सादर केलेली एक कमकुवत प्रेमकथा

साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले

'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचे ४२ लाख रुपयांचे बिल शाहरुख खानने माफ केले; चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला

3 इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी, राजकुमार हिरानी यांनी कथेचे गुपित उघड केले

'वेलकम टू द जंगल'मध्ये नवीन गाणे प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या आवाजाने 'दिवाने हैं' हा सुपरहिट ट्रॅक झाला

सर्व पहा

श्रद्धा कपूरचा 'इठा' चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांची मोठी मागणी

चंद्रचूड सिंग यांच्या वडिलोपार्जित हवेलीवरून वाद: काकीवर हक्क बळकावल्याचा आरोप, अभिनेत्याने केली न्यायाची मागणी

गोविंदाची पत्नी सुनीता तिच्या मुलासोबत अभिनयात पदार्पण करणार

अक्षय कुमार प्रियदर्शनच्या 'हैवान' या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारणार

महादेवाचे अश्रू पडले, त्या ठिकाणी आजही पाणी आहे; पाकिस्तानातील या चमत्कारिक कुंडाचे रहस्य तुम्हाला माहित आहे का?

पुढील लेख
Show comments