रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 फेब्रुवारी 2024 (11:45 IST)

सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्री गिरीजा प्रभू ने मुंबईत नवीन घर घेतलं

girija prabhu
Photo- Instagram
मुंबईकरांना मुबंईत स्वतःच घर असावे असे अनेकांना वाटते.लोक मुंबईत घर घेण्यासाठी मेहनत करतात आणि आपले घर घेण्याचं स्वप्नं  पूर्ण करतात. मुंबईत घर घेण्यासाठी अनेक वर्ष मेहनत करावी लागते तर काहींचे हे स्वप्नं  कमी वयातच पूर्ण होतात. मुंबईत सुख म्हणजे नक्की काय असतं  फेम अभिनेत्री गिरीजा प्रभूने वयाच्या 24 व्या वर्षी घर घेण्याचे स्वप्नं पूर्ण केले आहे. स्टार प्रवाह वरील ही मालिका सुख म्हणजे नक्की काय असत या मध्ये तिने गौरीची भूमिका साकारली आहे. या मालिकेतून ती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आहे. 
 
अभिनेत्री गिरीजाने मार्गशीर्षात नव्या घराची पूजा केली तिने आपल्या घराचे काही फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहे. चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @girijaprabhu_official

गिरिजाने आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर तीन फोटो शेअर केले आहे.त्यात इन आपल्या घराच्या प्रवेशदारावर लावलेली तिच्या नावाची पाटी खणाची डिझाईन असून त्याच्या मध्यभागी पांढऱ्या रंगाने तिचे नाव लिहिले आहे. खाली बाजूला घुंगराची डिझाईन करण्यात आली आहे. तिने लिंबू रंगाचा ड्रेस घातला आहे. ती या ड्रेसमध्ये खूप छान दिसत आहे. गिरीजा नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमी आपल्या लाइफचे अपडेट प्रेक्षकांमध्ये शेअर करते. तिला चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

 Edited by - Priya Dixit