सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 डिसेंबर 2023 (13:57 IST)

स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णीचा लग्नसोहळा पार पडला

दिल दोस्ती दुनियादारी फेम अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व प्रसिद्ध गायक आशिष कुलकर्णी 25 डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकले. स्वानंदी आणि आशिषच्या विवाह सोहळ्यातील विविध कार्यक्रमांचे आणि विधींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Majja (@its.majja)

या दोघांचा साखरपुडा जुलै महिन्यात पार पडला होता आता ही लोकप्रिय जोडी लग्नबंधनात अडकली आहे. अभिनेत्रीने लग्नातील सर्व फोटोंना आनंदी हा हॅशटॅग वापरला आहे. स्वानंदीने लग्नाच्या फोटोंना मिस्टर अँड मिसेस कुलकर्णी आनंदी असे कॅप्शन दिले आहे. 
 
लग्नात स्वानंदीने पिवळ्या रंगाची पैठणी साडी नेसली आहे तर आशिषने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी परिधान केल्याचे दिसून येत आहे. लग्नात अनेक कलाकरांनी उपस्थिती लावली होती.
 
स्वानंदी‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचली. नंतर तिने ‘अस्सं माहेर नको गं बाई’, “अगं अगं सुनबाई…” या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. तर आशिष कुलकर्णी उत्तम गायक आणि गीतकार आहे.