1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (20:46 IST)

'श्रीगणेशा' ने होणार गणेशोत्सवाचा उत्साह द्विगुणित !

shri ganesha
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वत्र आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. यंदाचा हा गणेशोत्सव अधिक चैतन्यमय आणि खास करण्यासाठी ''अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि.'' घेऊन येत आहे एक भक्तिमय गाणं.
 
''श्रीगणेशा देवा श्रीगणेशा...'' हे गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या गाण्याचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून या गाण्याला आदर्श शिंदे यांचा भारदस्त आवाज लाभला आहे. तर सगळीकडे सकारात्मक वातावरण निर्माण करणाऱ्या या गाण्याला ओंकार घाडी यांनी शब्दबद्ध केले असून काशी रिचर्ड यांचे या गाण्याला संगीत लाभले आहे. ‘’अल्ट्रा मीडिया ॲंड एंटरटेनमेंट प्रा. लि. प्रस्तुत या गाण्याचे सुशिलकुमार अग्रवाल निर्माता आहेत.
 
 गणपती हा बुद्धीचा दैवत आहे, विघ्नहर्ता आहे, तारणकर्ता आहे. त्याची मनोभावे आराधना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. महाराष्ट्रात गणेशोत्सव सर्वत्र अगदी उत्साहात साजरा केला जातो. त्यात 'श्रीगणेशा' या गाण्याने हा उत्साह द्विगुणित होणार आहे.