मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (07:44 IST)

बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझन पहिल्या सहा स्पर्धकांच्या नाव

tejaswinilonari
बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनला धूम धडाक्यात सुरुवात झाली आहे. यावेळीचं सीझन हटके ठरणार याची चुणूक आता पहिल्या सहा स्पर्धकांच्या नावांवरुनच लक्षात येतं. बिग बॉस सीझन ४ चं ग्रँड प्रिमिअर आता सुरू आहे. आतापर्यंत घरात तेजस्विनी लोणारी, प्रसाद जवादे, निखिल राजेशिर्के, अमृता धोंगडे, किरण माने आणि  हे दाखल झाले आहेत.
 
'बिग बॉस' मराठीच्या चौथ्या सीझनची धडाक्यात सुरुवात, 'देवमाणूस' फेम अभिनेत्री पहिली स्पर्धक!
 
'देवमाणूस' मालिकेत आमदार बाईच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेल्या तेजस्विनी लोणारी ही यंदाच्या 'बिग बॉस'च्या सीझनची पहिली स्पर्धक ठरली आहे. याशिवाय तिनं चिनू, गुलदस्ता यांसारख्या चित्रपटातही काम केलं आहे. घरात दाखल होण्याआधीच तेजस्विनीला पहिली ड्युटी 'बिग बॉस'नं दिली आहे. 'बिग बॉस'च्या घरात तेजस्विनीला स्वयंपाक घराची जबाबदारी मिळाली आहे.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेतून सर्वांचं लक्ष वेधून घेतलेला अभिनेता प्रवाद जवादे 'बिग बॉस'च्या घरातील दुसरा स्पर्धक ठरला आहे. दमदार नृत्य सादर करत जवादे घरात दाखल झाला. प्रसादलाही स्वयंपाक घराची जबाबदारी मिळाली आहे. 'झी मराठी'वरील 'माझी तुझी रेशीम गाठ' मालिकेत 'अविनाश'ची भूमिका साकारलेला अभिनेता निखिल राजेशिर्के देखील 'बिग बॉस'मध्ये आपलं नशीब आजमवणार आहे. राजेशिर्के याच्यासोबत 'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेत मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री अमृता धोंगडे घरात दाखल झाली आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor