शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 29 मार्च 2022 (21:09 IST)

'अदृश्य' चित्रपट बघण्याची टायगर श्रॉफला उत्सुकता ...

अदृश्य चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर लाल हे बॉलिवुड चे प्रख्यात सिनेमॅटोग्राफर आहेत. विशेष बाब म्हणजे 'अदृश्य' सह त्यांनी तीन अन्य भाषां मध्ये अन्य कलाकारांना घेऊन चित्रपट बनवले आहेत. एकाच वेळी ४ भाषां मध्ये चित्रपट शूट होणे हे पहिल्यांदाच घडत आहे. त्यातला पहिला मराठी भाषेतील चित्रपट 'अदृश्य' १३ मे रोजी प्रदर्शित होत आहे. 
 
बॉलिवुडचा आघाडीचा अभिनेता टायगर श्रॉफला देखील या चित्रपटांबद्दल प्रचंड उत्सुकता आहे आणि त्यांनी आपल्या शुभेच्छा कबीर लाल सर व चित्रपटाच्या टीमला दिल्या आहेत.
 
'अदृश्य'चा टिजर लवकरच येत आहे ...
'अदृश्य' चित्रपटात पुष्कर जोग, मंजिरी फडणीस,अनंत जोग, उषा नाडकर्णी,अजय कुमार सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 
'अदृश्य' हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असून अजय कुमार सिंग आणि रेखा सिंग हे चित्रपटाचे निर्माते आहेत शाहिद लाल यांनी सिनेमॅटोग्राफीची धुरा सांभाळली आहे. चित्रपटाचे संकलन संजय इंगळे यांनी केले आहे आणि संवाद निखिल कटरे व चेतन किंजाळकर यांनी लिहिले आहेत.