1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 18 नोव्हेंबर 2023 (16:07 IST)

‘रमा राघव’ मालिकेचा उद्या निर्णायक महारविवार

colors marathi rama raghav
कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’ ही लोकप्रिय मालिका उत्कंठावर्धक टप्प्यावर असून या मालिकेचा निर्णायक महारविवार 19 नोव्हें, दु. १२ आणि संध्या. 6 वा प्रसारित होणार आहे. मालिकेच्या कथानकाला पूर्णपणे कलाटणी देणाऱ्या या भागाची विशेष चर्चा सध्या सोशल मिडियावर सुरू आहे. राघवच्या सहवासात पूर्णपणे बदलेल्या रमाला लवकरात लवकर पुरोहितांची सून व्हायचे आहे. तिला राघवचा त्याच्या घरच्यांचा विरह सहन होत नाही आहे, त्यामुळे राघवच्या वडिलांनी राघवला घातलेल्या बंधनातून मार्ग काढून, वेषांतर करून, पुरोहित घरात राहून, दिवाळीचा उत्साह संपूर्ण कुटुंबात कायम राहील याची काळजी घेतली. अप्रत्यक्षपणे रमाची ही पहिली दिवाळी मोठ्या धुमधडाक्यात साजरी झाली मात्र हेच रमाचे वेषांतर तिच्या विरोधात जाईल का ? 
rama raghav
 जन्मदात्या आईच्या सगळ्या कुटिल कारस्थानांना पुरून उरलेल्या आणि वडिलांचा ठाम पाठिंबा मिळालेल्या रमाच्या आयुष्यात हे वेषांतर काय वादळ आणणार आणि हे कथानक पुढे कसे जाणार या प्रश्नांची उत्तरे या महारविवारमध्ये मिळणार असून त्यामुळेच या भागाची प्रेक्षकांना विशेष उत्सुकता आहे. 'रमा राघव'चे लग्न लवकरात लवकर व्हावे ही तमाम प्रेक्षकांची इच्छा हा भाग पूर्ण करेल का? यासाठी नक्की पाहा, 'रमा राघव – महारविवार', 19 नोव्हें, दु. 12 आणि संध्या. 6 वा. फक्त कलर्स मराठीवर.