1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 13 नोव्हेंबर 2022 (15:54 IST)

Tujhyat Jeev Rangala : तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री कल्याणी कुरुळे -जाधवचे अपघाती निधन

Marathi Actress Kalyani Kurale Jadhav Passed Away: लोकप्रिय मराठी मालिका तुझ्यात जीव रंगला फेम कल्याणी कुरुळे जाधव या अभिनेत्रींचे रास्ता अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापुरातील हालोंडी सांगली फाटा येथे भरधाव येणाऱ्या डंपरची धडक लागल्याने तिचा मृत्यू झाला. 
 
तुझ्यात जीव रंगला या मालिकेत तिने नामवंत कलाकारांसह काम केले. दख्खनचा राजा या तिच्या लोकप्रिय मालिका आहेत. तिने हालोंडी फाटा येथे प्रेमाची भाकरी नावाचे हॉटेल उघडले हॉटेल मधून बाहेर पडताना भरधाव डंपरने तिला धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. कल्याणीने आठवड्यापूर्वीच आपला वाढदिवस साजरा केला होता. तिने इंस्टाग्रामवर भाकऱ्या थापतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यावर तिने छानसे कॅप्शन देखील लिहिले.

तिचे इंस्टावर सुमारे 3 हजारापेक्षा अधिक फॉलोअर्स आहे. तिच्या निधनाने मराठी सिने सृष्टीत शोककळा पसरली आहे.  
 
Edited By - Priya Dixit