शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: नवी मुंबई , मंगळवार, 7 जून 2016 (10:28 IST)

'हसले आधी कुणी' एक पात्री नाटकाचा मुहूर्त संपन्न

तुम्हाला ‘मोलकरीण’ या चित्रपटातील ‘हसले आधी कुणी’ हे गीत आठवतंय का...हो तेच गाणे ज्यात प्रसिद्ध अभिनेते रमेश देव व सीमा यांचा 1960 सालचा रोमान्सचा तडका आपल्याला पहायला मिळाला...हे गाणे आठवायचे कारण असे की आता याच गाण्य़ाच्या नावाने म्हणजेच ‘हसले आधी कुणी’ हे नवे एक पात्री नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘क्राफ्टसमन आसोसिअसन ऑफ फिल्म’ या संस्थेने या नाटकाची निर्मीती केली असून नाटकाचे प्रयोग लवकरच सुरू करणार आहेत.

क्राफ्टसमन आसोसिअसन ऑफ फिल्म, थेटर, टेलीविजन व आंतराष्ट्रीय मानवाधिकार संघ यांच्या संयुक्त रित्या आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ‘हसले आधी कुणी’ या एकपात्री नाटकाचा मुहूर्त प्रसन्न आणि उत्सवी वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी चित्रपट व नाट्यक्षेत्रातील उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते मुहुर्ताचा नारळ वाढविला गेला. दारुच्या अतिप्राशनाचे होणारे दुष्परिणाम, शरीरस्वास्थ्याची होणारी हेळसांड, दारुमुळे कौटुंबिक व व्यावसायिक आयुष्यातील वाढणारे ताणतणाव याबाबत जनजागृती करणारे हे नाटक असून याचे दिग्दर्शन सचिन गायकवाड व लेखन प्रकाश राणे यांनी केले आहे. उपस्थित मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रातील अनुभव व शूटिंगच्या वेळेतील अनुभव गमती सांगून तसेच नवोदित कलाकारांन मार्गदर्शन करून हा मुहूर्त सोहळा आणखी रंगात आणला. लकरच हे नाटक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी रंगभूमीवर दाखल होणार असून हे नाटक व्यसनांच्या आहारी गेलेल्या अनेकांच्या आयुष्यात नक्कीच बदल घडवेल, असा विश्वास प्रमूख पाहूणे मुनिरभाई तांबोळी यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आंतराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुनिरभाई तांबोळी यांच्यासह फिल्म क्षेत्रातील दिग्दर्शक देवेंद्र सुपेकर, अभिनेते प्रकाश राणे, संगीत दिग्दर्शक समीर फटेरपेकर, दिग्दर्शक अजय डेविड, तारक मेहता मालिका हेंड अरविंद मर्चन्दे,डिजायनर वर्षा जाधव, अभिनेते श्रीकांत कामत,  प्रज्ञा भालेकर विचारे, दिग्दर्शक सचिन गायकवाड , नयन पवार.सिद्दी कामत, सुरेखा, संजय, तनुजा, संजना आदी उपस्थित होते.