भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना रायपूर स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल करण्यात आले आहे, अक्षर पटेलच्या जागी कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहच्या जागी हर्षित राणा यांचा समावेश आहे. किवींनी या सामन्यासाठी तीन मोठे बदल केले आहे.
टी२० मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ
डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), टिम रॉबिन्सन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल सँटनर (कर्णधार), ख्रिश्चन क्लार्क, काइल जेमिसन, ईश सोधी, जेकब डफी, जेम्स नीशम, मॅट हेन्री, मायकेल ब्रेसवेल, झॅकरी फॉल्क्स, बेवन जेकब्स.
टी२० मालिकेसाठी भारतीय संघ
संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, हर्षित राणा, कुलदीप यादव.
टीम इंडियाने आतापर्यंत रायपूरमध्ये एक सामना खेळला आहे. भारतीय संघाने रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर फक्त एकच टी-२० सामना खेळला आहे, जिथे त्यांचा सामना ऑस्ट्रेलियन संघाशी झाला होता. टीम इंडियाने हा सामना २० धावांनी जिंकला.
Edited By- Dhanashri Naik