शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 26 जून 2021 (17:32 IST)

उपलब्धी ; मिताली राजने घडला इतिहास,तेंडुलकर नंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार मिताली राजची गणना जगातील अव्वल महिला क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. तिने महिला क्रिकेट संघाला मोठ्या उंचावर नेले.तिने आपल्या कारकीर्दीत अनेक टप्पे पार केले आहेत. आज मिताली राजने तिच्या कारकीर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. तिने  एकदिवसीय आंतरराष्ट्रीय करिअरची 22 वर्षे पूर्ण केली आहेत. महान फलंदाज सचिन तेंडुलकर नंतर मिताली ही कामगिरी करणारी जगातील दुसरी खेळाडू आहे.
 
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार मिताली राजने 26 जून 1999 रोजी आयर्लंड विरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. त्यांची वनडे आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत आज 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. यापूर्वी सचिन तेंडुलकरने असे केले होते.तेंडुलकरची कारकीर्द 22 वर्षे आणि 91 दिवसांपर्यंत होती.सचिन तेंडुलकर यांनी पाकिस्तानच्या विरुद्ध 18 डिसेंबर 1989 रोजी पदार्पण केले आणि 18 मार्च 2012 रोजी पाकिस्तानविरुद्ध शेवटचा सामना खेळला.
 
हा विक्रम देखील मितालीच्या नावावर आहे.
 
वर्ष 1999. मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी मिताली एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6000 धावा पूर्ण करणारी पहिली महिला क्रिकेटपटूही आहे. 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या इंग्लंडचा चार्लोट एडवर्ड्स या 5992 एकदिवसीय धावा करणाऱ्या मिताली नंतर सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या  यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे.
 
यापूर्वी मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारी ती जगातील पहिली भारतीय आणि दुसरी क्रिकेटपटू ठरली आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार चार्लोट एडवर्ड्स ही मितालीच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 पेक्षा जास्त धावा मिळविणारी एकमेव महिला क्रिकेटपटू आहे.