बीसीसीआयच्या प्रशासकीय पदाचा रामचंद्र यांनी दिला राजीनामा
रामचंद्र गुहा यांनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी तडकाफडकी हा निर्णय घेतल्याने उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर 4 जणांची प्रशासकीय समिती नियुक्त केली होती. रामचंद्र गुहा या समितीवर होते.
लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याची बीसीसीआयची तयारी नसल्याने यावर्षी 30 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचा कारभार चालवण्यासाठी प्रशासकीय समितीची नियुक्ती केली. कॅगचे माजी अध्यक्ष विनोद राय बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख आहेत. माजी क्रिकेटपटू डायना इडुलजी, विक्रम लिमये, विनोद राय आणि रामचंद्र गुहा या चौघांची सर्वोच्च न्यायालयाने नियुक्ती केली होती.
एका राज्य, एक मत ही शिफारस लागू करण्यात विनोद राय समिती यशस्वी ठरलेली नाही. अजूनही बीसीसीआयमध्ये लोढा समितीच्या सर्व शिफारशींची अंमलबजावणी झालेली नाही. आयसीसीकडून मिळणा-या महसूलातही मोठी कपात झाली आहे त्यावरुन बीसीसीआय पदाधिकारी आणि प्रशासकीय समितीमध्ये मतभेद निमार्ण झाले आहेत. मात्र, व्यक्तीगत कारणांसाठी आपण राजनीमा देत असल्याचे गुहा यांनी सांगितले.