रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 18 ऑक्टोबर 2017 (09:32 IST)

भारताविरुद्ध मालिकेसाठी न्यूझीलंड संघ जाहीर

भारताविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी ग्लेन फिलिप्स आणि टॉड ऍस्टल या दोन नवोदितांसह मॅट हेन्‍री, हेन्‍री निकोल्स, कॉलिन मन्‍रो आणि जॉर्ज वर्कर अशा एकूण सहा खेळाडूंचा नव्याने समावेश करण्यात आलेल्या न्यूझीलंडच्या संघाची आज घोषणा करण्यात आली. यातील ग्लेन फिलिप्स आणि टॉड ऍस्टल या दोघांनाही वन डे पदार्पणाची संधी असल्याचे मानले जात आहे. फिलिप्सने भारत अ संघाविरुद्ध नुकतीच नाबाद 140 धावांची खेळी केली होती.
या संघातील 9 खेळाडू अगोदरच जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर भारताच्या दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंड अ संघातील सहा जणांचा त्यात समावेश करण्यात आला. एकदिवसीय मालिकेनंतर रॉस टेलर व जॉर्ज वर्कर मायदेशी परततील. एकदिवसीय मालिेसाठी लेगस्पिनर ईश सोधीऐवजी टॉड ऍस्टलला पसंती देण्यात आली आहे. मात्र टी-20 मालिकेसाठी सोधी संघात परतेल. न्यूझीलंड संघ पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी दोन सराव सामने खेळणार आहे.
 
न्यूझीलंडचा एकदिवसीय संघ– केन विल्यमसन (कर्णधार), टॉड ऍस्टल, ट्रेन्ट बोल्ट, कॉलिन डी ग्रॅंडहोम, मार्टिन गुप्टिल, मॅट हेन्‍री, टॉम लेथॅम, हेन्‍री निकोल्स, ऍडम मिल्ने, कॉलिन मन्‍रो, ग्लेन फिलिप्स, मिशेल सॅन्टनर, टिम साऊदी, रॉस टेलर व जॉर्ज वर्कर.
न्यूझीलंडचा टी-20 संघ- केन विल्यमसन (कर्णधार), टॉड ऍस्टल, ट्रेन्ट बोल्ट, टॉम ब्रूस, कॉलिन डी ग्रॅंडहोम, मार्टिन गुप्टिल, मॅट हेन्‍री, टॉम लेथॅम, हेन्‍री निकोल्स, ऍडम मिल्ने, कॉलिन मन्‍रो, ग्लेन फिलिप्स, मिशेल सॅन्टनर, ईश सोधी व टिम साऊदी.