सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 6 ऑगस्ट 2022 (19:24 IST)

CWG Ind vs ENG T20 :महिला क्रिकेटमध्ये भारताचे पदकही निश्चित, टीम इंडियाने अंतिम फेरीत इंग्लंडचा पराभव करत, चार धावांनी विजय

Commonwealth Games 2022 Ind vs ENG T20 : कॉमनवेल्थ गेम्समधील महिला क्रिकेटच्या सेमीफायनल सामन्यात भारताने इंग्लंडचा चार धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारताने इंग्लंडला 165 धावांचे लक्ष्य दिले होते आणि प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ 160 धावाच करू शकला. या विजयासह भारताचे पदक निश्चित झाले आहे. 
 
भारतीय संघाने इंग्लंडचा चार धावांनी पराभव केला. यासह भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. 165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला सहा विकेट्सच्या मोबदल्यात केवळ 160 धावा करता आल्या आणि चार धावांनी सामना गमावला. भारतीय महिला क्रिकेट संघाने आपले पदक निश्चित केले आहे. आता अंतिम फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. अंतिम सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता होणार आहे.