बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 22 डिसेंबर 2020 (13:43 IST)

भारताचा पराभव होताच धोनी ट्रेंडवर

भारताच पराभवानंतर टि्वटरवर धोनी ट्रेंड जोरात सुरू आहे. अॅडलेड मैदानावरील पराभव पाहताना नेटकर्यांना धोनीची आठवण आली असल्याचे या ट्रेंडवरून पाहायला मिळाले. अनेक वेळा मर्यादित षटकांचा किंवा कसोटी सामना असो, धोनीने भारताला अखेरच्या क्षणी विजय मिळवून दिला आहे. 
 
याच क्षणाचे दाखले देत नेटकर्यांनी ‘मिस यू धोनी' असे म्हणत त्याचे काही मिम्स व्हायरल केले आहेत. या हॅशटॅगचा वापर करत 5 हजार पेक्षा अधिक टि्वट करण्यात आले आहेत.