रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 15 डिसेंबर 2017 (08:50 IST)

गौतम गंभीरची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली

टीम इंडियाचा क्रिकेटपटू गौतम गंभीरची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. एका रेस्टोरंट-बारने त्यांच्या पबच्या जाहिरातीसाठी गौतम गंभीर हे नाव वापरलं होतं, ते हटवण्याची मागणी गंभीरने याचिकेद्वारे केली होती. मात्र कोर्टाने त्याला नकार दिला.
 
त्याचे कारण म्हणजे त्या पबच्या मालकाचे नावही गौतम गंभीरच आहे. त्यामुळे कोर्टाने ते नाव न वापरण्याची गंभीरची मागणी फेटाळली.
 
नेमके काय आहे संपूर्ण प्रकरण?
 
पश्चिम दिल्लीतील पंजाबी बाक परिसरात डीएसपी आणि कंपनीचे दोन पब आहेत. घुंघरू आणि हवालात अशी त्यांची नावं आहेत. पब मालकाचंही नाव गौतम गंभीर आहे. या पबची जाहिरात ‘बाय गौतम गंभीर’ अशी केली जाते.
 
मात्र हे पब आपलेच आहेत अशी लोकांची धारणा होत आहे, त्यामुळे गौतम गंभीर हे नाव हटवावं, अशी मागणी क्रिकेटपटू गंभीरने केली होती. या नावामुळे माझ्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याचेही गंभीरने याचिकेत म्हटलं होतं. पण कंपनीने कोर्टात दावा केला की, मालकाचं नावही गौतम गंभीर असल्यामुळे आम्ही तेच वापरत आहोत. कोर्टाने कंपनीचं म्हणणं मान्य करत, क्रिकेटपटू गंभीरला झटका देत, त्याची याचिका फेटाळली.