बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : सोमवार, 26 जुलै 2021 (15:28 IST)

भूताने क्रिकेट सामना रोखला! बेल्स पडताना बघून क्रिकेटर्स आश्चर्यचकित झाले

कधी कधी क्रिकेटच्या क्षेत्रात विचित्र गोष्टी घडतात. झिम्बाब्वे आणि बांगलादेश यांच्यातील दुसर्‍या टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान अशीच एक भयानक घटना उघडकीस आली. यामुळे क्रिकेटर्सनाही आश्चर्य वाटले. स्टंपजवळ फलंदाज नसताना रहस्यमयरित्या बेल्स विकेटवरुन आपोआप पडल्या.
 
ही घटना बांगलादेशच्या डावाच्या 18 व्या षटकात मोहम्मद सैफुद्दीन स्टाइकवर असताना घडली. पुलशॉट खेळताना सैफुद्दीनने जेव्हा स्टंपवर 'किक मारली', तेव्हा त्याने मागे वळून बघितले की नेमकं काय झालं कारण त्याने बेल्स पडल्याची आवाज ऐकली. पण बांगलादेशी फलंदाज खरोखरच हिट-विकेट होते का? जेव्हा हे तपासण्यासाठी फुटेज स्कॅन केले गेले तेव्हा असे दिसून आले की बेल्स जागेवरुन वार्‍याने हळू हळू खाली पडले आहेत.