शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 एप्रिल 2023 (16:48 IST)

हार्दिक पांड्याला 12 लाखांचा दंड

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला गुरुवारी रात्री पंजाब किंग्जविरुद्धच्या आयपीएल सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सध्याच्या आयपीएलमध्ये ओव्हर रेट ही एक प्रमुख समस्या आहे आणि अनेक सामने जवळपास चार तास चालले आहेत. "आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत या मोसमातील हा संघाचा स्लो ओव्हर रेटचा पहिला गुन्हा असल्याने पांड्याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे," असे टूर्नामेंटने जारी केलेले निवेदन म्हटले आहे .
 
याआधी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन यांना त्यांच्या सामन्यांमध्ये संथ ओव्हर-रेटसाठी समान रकमेचा दंड ठोठावण्यात आला होता. रविवारी घरच्या मैदानावर गुजरातची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल, तर पंजाबची लढत शनिवारी लखनऊशी होईल.
 
Edited By - Priya Dixit