संबंधित माहिती
- Women's ICC Ranking एकदिवसीय क्रमवारीत हरमनप्रीत सातव्या स्थानावर, फलंदाजांमध्ये मंधानाचे अव्वल स्थान कायम
- बीसीसीआयने नमन पुरस्कारांची घोषणा केली, शुभमन गिल ,स्मृती मानधना यांना क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार
- महिला क्रिकेटमध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठत हरमनप्रीत कौरने विश्वविक्रम रचला
- RCB ला मोठी रोख रक्कम मिळाली, दिल्ली कॅपिटल्सना 3 कोटी मिळाले
- स्मृती मंधानाने WPL फायनलमध्ये अर्धशतकासह एक मोठी कामगिरी करत इतिहास रचला
हरमनप्रीतची टी-२० क्रमवारीत सुधारणा, मंधानाने दुसरे स्थान कायम राखले
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत १४ वे स्थान मिळवत आपल्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत सुधारणा केली आहे. दरम्यान, सलामीवीर स्मृती मंधाना दुसऱ्या स्थानावर कायम आहे. मंधाना व्यतिरिक्त, आक्रमक फलंदाज शफाली वर्मा ही अव्वल १० खेळाडूंमधील दुसरी भारतीय खेळाडू आहे. तिने आपले सहावे स्थान कायम राखले आहे, तर जेमिमा रॉड्रिग्स संयुक्त ११ व्या स्थानावर कायम आहे.
गोलंदाजी विभागात, फिरकी अष्टपैलू दीप्ती शर्मा एका स्थानाने वर चढून तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे, तर वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर सहाव्या स्थानावर कायम आहे. वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डी अव्वल १० मधून बाहेर पडून ११ व्या स्थानावर घसरली आहे.
अष्टपैलूंच्या क्रमवारीतही दीप्ती तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाची सलामीवीर जॉर्जिया वोलने पहिल्यांदाच फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल १० मध्ये प्रवेश केला आहे, तर न्यूझीलंडची स्टार खेळाडू सोफी डिव्हाईनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलेल्या सलग दोन अर्धशतकांमुळे ती दोन स्थानांनी वर चढून यादीत १८ व्या स्थानावर पोहोचली आहे.
रवांडाची १५ वर्षीय फॅनी उटागुशिमानिंदे, तिच्या टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पणात (घानाविरुद्ध) शतक झळकावणारी पहिली महिला ठरली. तसेच, ती पुरुष आणि महिला क्रिकेट या दोन्ही प्रकारांमध्ये, खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारी सर्वात तरुण खेळाडूही ठरली आहे. यामुळे तिने क्रमवारीत ६६ वे स्थान पटकावले आहे.
Edited By - Priya Dixit
